Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड रणवीर सिंग आणि अनिल कपूर जोडी पुन्हा एकदा धमाल करायला सज्ज; प्रोजेक्टसाठी केली हातमिळवणी

रणवीर सिंग आणि अनिल कपूर जोडी पुन्हा एकदा धमाल करायला सज्ज; प्रोजेक्टसाठी केली हातमिळवणी

जेव्हा एनर्जी आणि फिटनेसबाबत बोलले जाते, तेव्हा बॉलिवूडमधील या दोन कलाकारांचे नाव घ्यायला कोणीही विसरत नाही. आतापर्यंत तुम्हाला कळलेच असेल आपण कोणाबद्दल बोलत आहोत. ते म्हणजे बॉलिवूडमधील पॉवरहाऊस रणवीर सिंग आणि एव्हरग्रीन अनिल कपूर. दोघांची एक बातमी सध्या वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. हे दोन सितारे पुन्हा एकदा एका प्रोजेक्टसाठी एकत्र काम करणार आहेत. याबाबत रणवीर सिंगने स्वत: इंस्टाग्रामवर खुलासा केला आहे.

नुकतेच रणवीर सिंग आणि अनिल कपूर यांचे काही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये अनिल कपूरने पांढरा शर्ट आणि निळी टाय घातली आहे. तो सूटमध्ये दिसत आहे. यासोबतच रणवीर सिंग निळ्या रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचा ट्राउझर घातला आहे.

रणवीर सिंगने सांगितले की, अनिल कपूर हे त्यांच्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे. रणवीर कपूरने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “मी माझा आनंद असा शब्दात व्यक्त नाही करू शकत की, मला एवढ्या मोठ्या कलाकारासोबत परत एकदा काम करण्याची संधी मिळत आहे.”

हाती आलेल्या माहितीनुसार, हे दोन कलाकार कोणत्या चित्रपटात नाही, तर एका जाहिरातीमध्ये एकत्र काम करणार आहेत. अनिल कपूर आणि रणवीर सिंग एकाच फ्रेममध्ये दिसणार आहे. हे दोघे स्वास्थ आणि आरोग्यासंबंधी जागरूक करताना एक जाहिरातीमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहे. याआधी या दोघांनी ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खेसारी लालचं नवीन गाणं रिलीझ, पंजाबी गायकांनाही देतोय टक्कर; चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद

-सुपरस्टार अरविंद आणि काजल पहिल्यांदाच दिसले रोमान्स करताना, व्हिडिओ पाहून प्रेक्षक भलतेच खुश

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा