Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड जयललितांच्या जीवनावर आधारित थलायवी सिनेमातील ‘चली चली’ गाण्याचा ट्रेलर रिलीझ, कंगनाच्या खास अदा नक्की पाहा

जयललितांच्या जीवनावर आधारित थलायवी सिनेमातील ‘चली चली’ गाण्याचा ट्रेलर रिलीझ, कंगनाच्या खास अदा नक्की पाहा

कंगना राणावत सध्या तिचा आगामी ‘थलायवी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा चित्रपट तामिळनाडूमधील राजनेता आणि दिग्गज अदाकारा‌‌ जयललिता यांच्या जीवनावर आणि फिल्मी कारकिर्दीवर आधारित आहे. ही बायोपिक जयललिता यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहे. जयललितांबद्दल अनेक गोष्टी जरी चाहत्यांना माहित असल्या तरी अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या चाहत्यांना माहित देखील नाही. अशाच गोष्टींचा उलगडा कंगनाच्या थलायवी सिनेमात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी या सिनेमातील चली चली गाण्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

यामध्ये ती पाण्यात खेळताना, पोहताना दिसत आहे. चली चली हे गाणे एका पुलमध्ये शूट केले आहे. यासाठी कंगना 24 तास पाण्यात होती. गाण्यामध्ये याची झलक दिसतच आहे. या गाण्यात जयललिता यांच्या कारकिर्दीचा सुरुवातीचा काळ दाखवला आहे.

या गाण्याची शूटिंग एका स्टुडिओच्या फॉरमॅटमध्ये केली केली आहे. जसे आधीच्या जमान्यात होत असे. या चित्रपटाचा बहुतांश भाग स्टुडिओमध्येच शूट केला आहे. चली चली या गाण्याची शूटिंग जवळपास 3 दिवस चालू होती. यामध्ये जयललिता यांच्या प्रत्येक गोष्टीला मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्याला ‘जीवी प्रकाश कुमार’ यांनी संगीत दिले आहे तर ‘सैनधवी’ यांनी हे गाणे गायले आहे.

या गाण्याचा संबंध जयललिता यांचा 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेणीरा अडाई’ या चित्रपटाशी येतो. हा एक ऍडल्ट चित्रपट आहे. त्यामुळे त्यावेळी जयललिता यांनी त्यांचा पहिला चित्रपट पाहिला नव्हता. कारण त्यावेळी त्या 18 वर्षा पेक्षाही कमी होत्या. थलायवी या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘एएल विजय’ यांनी केले आहे. ‘विष्णु वर्धन इंदूरी’ आणि आरसिंग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. थलायवी हा चित्रपट 24 एप्रिलला तमिळ, तेलुगु आणि हिंदी या भाषांमध्ये रिलीझ होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-म्हणून सपनाला देसी क्वीन म्हणतात! अवघ्या काही दिवसांत सपनाच्या ‘या’ गाण्याला मिळालेत २ कोटी व्ह्यूज

-‘भेडिया’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री क्रिती सेननने धक्का दिल्यानंतर पाण्यात पडता पडता वाचला वरुण धवन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा