सन 1997मध्ये ‘बॉर्डर‘ हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा 1971च्या भारत- पाकिस्तान युद्धावर आधारित होता. हे युद्ध भारतीय सैन्याने जिंकले होते. या युद्धात भारताला विजय मिळवून देणारे भैरों सिंग राठोड हे आयुष्याची लढाई हारले आहेत. त्यांनी जोधपूरच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान त्यांचे रविवारी (दि. 19 डिसेंबर) निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर पंतप्रधानांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी दु:ख व्यक्त केले आहे. यामध्ये अभिनेता सुनील शेट्टी याचाही समावेश आहे. सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ या सिनेमात भैरों सिंग यांची भूमिका साकारली होती.
सुनील शेट्टीचे ट्वीट
भैरों सिंग राठोड (Bhairon Singh Rathore) यांच्या निधनावर अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) याने ट्वीट करत दु:ख व्यक्त केले. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “रेस्ट इन पावर नायक भैरों सिंग जी. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या भावपूर्ण संवेदना.”
Rest in Power Naik Bhairon Singh Ji. Heartfelt condolences to the family ???? https://t.co/5A531HeouG
— Suniel Shetty (@SunielVShetty) December 19, 2022
सुनील शेट्टीव्यतिरिक्त भैरों सिंग यांना अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Naik (Retd) Bhairon Singh Ji will be remembered for his service to our nation. He showed great courage at a crucial point in our nation's history. Saddened by his passing away. My thoughts are with his family in this hour of sadness. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) December 19, 2022
The nation is indebted to people like #BhaironSingh Ji …
His heroics remind us that secular India transients the borders of caste or religion … #JaiHind to heroes like him ????????#Longewala #BSF #realheroes #OmShanti https://t.co/kOGeggzAqB— Rahul Dev (@RahulDevRising) December 20, 2022
शौर्यासाठी सेना पदकाने करण्यात आले होते सन्मानित
भैरों सिंग यांना त्यांच्या 1971च्या युद्धात दाखवलेल्या शौर्यासाठी सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाची माहिती बीएसएफच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सोमवारी (दि. 19 डिसेंबर) देण्यात आली होती. त्यांनी ट्वीट करत लिहिले होते की, “डीजी बीएसएफ आणि इतर सर्व पदकांनी 1971च्या लोंगेवाला युद्धातील सेना पदक विजेते हिरो भैरों सिंग राठोड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.”
DG BSF & all ranks condole the passing of Naik (Retd) Bhairon Singh, Sena Medal, the hero of #Longewala battle during 1971 War. BSF salutes his intrepid bravery, courage & dedication towards his duty.
Prahari parivar stands by his family in these trying times.#JaiHind pic.twitter.com/nzlqNJUi9K— BSF (@BSF_India) December 19, 2022
‘बॉर्डर’मध्ये सुनील शेट्टीने साकारलेली भूमिका
खरं तर, 1997मध्ये रिलीज झालेला ‘बॉर्डर’ हा सिनेमा जबरदस्त हिट झाला होता. हा सिनेमा भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित होता. या सिनेमात बॉलिवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्यांनी काम केले होते. सुनील शेट्टी याने या सिनेमात भैरों सिंग यांची महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमात त्याच्याव्यतिरिक्त सनी देओल, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, सुदेश बैरी, पुनीत इस्सर, कुलभूषण खरबंदा, पूजा भट्ट, तब्बू, राखी आणि शरबानी मुखर्जी यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश होता. (actor suniel shetty paid tribute bsf soldier bhairon singh rathore actor play his roll in border)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तेरा घर चला जाएगा! बिग बॉसच्या घरामध्ये गली बॉयने केला पुन्हा एकदा राडा
राजामौलींमुळे चित्रपटसृष्टीची नासाडी? बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्रीने ‘आरआरआर’ चित्रपटावर केली टिका