Thursday, June 26, 2025
Home बॉलीवूड बापरे बाप!! एक, दोन नव्हे तर तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ड्रेस घालून प्रियांकाचे फोटोशूट, किंमत वाचून बसेल शॉक

बापरे बाप!! एक, दोन नव्हे तर तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ड्रेस घालून प्रियांकाचे फोटोशूट, किंमत वाचून बसेल शॉक

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपल नावं कमावणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असते. नुकताच तिने तिचा एक पिवळ्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे ती सर्वत्र चर्चेत आहे.

आपल्य़ा अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिने हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या दिवसात सूर्याच्या किरणांचा काय तरी वेगळाच परिणाम दिसत आहे.”

प्रियांका चोप्राच्या या फोटोला चाहते खूप पसंती दर्शवत आहेत. सगळ्यांमध्ये तिचा ड्रेस चर्चेचा विषय बनला आहे. Emilio Pucci’s RTW Resort 2011 यांच्या कलेक्शन मधील ड्रेस घालून प्रियांका चोप्राने तिच्या लंडनच्या घरी फोटोशूट केले आहे.

प्रियांकाच्या या ड्रेसची किंमत 6085 डॉलर्स म्हणजेच 4,46,346 रुपये एवढी आहे. वी नेक लाईन असलेल्या या ड्रेसला टाईट कमरेचा बेल्ट देखील आहे. तसेच तिच्या या ड्रेसला फ्रिल आहे.

प्रियांका चोप्रा ही मागील अनेक दिवसांपासून लंडनमध्ये राहत आहे. ती तिचा ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी इथे आली आहे. कोरोनामुळे ती तिथेच राहिली आहे. प्रियांका सध्या तिच्या सिटाडेल या वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या वेब सीरिजमध्ये प्रियांका चोप्रासोबत ‘गेम ऑफ थ्रोन्स’ अभिनेता ‘रिचर्ड मॅडन’ काम करणार आहे. या सीरिजमधील तिचे अनेक फोटो समोर आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-म्हणून सपनाला देसी क्वीन म्हणतात! अवघ्या काही दिवसांत सपनाच्या ‘या’ गाण्याला मिळालेत २ कोटी व्ह्यूज

-‘भेडिया’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री क्रिती सेननने धक्का दिल्यानंतर पाण्यात पडता पडता वाचला वरुण धवन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा