शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर ‘पठाण‘ रिलीजच्या जवळ आला आहे, परंतु सध्या सुरू असलेला वाद थांबण्याचे नावच घेत नाहीये. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. सेन्सॉर बोर्डाने अनेक चित्रपटांच्या अनेक दृश्यांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. ‘बेशरम रंग‘ या गाण्यात दीपिका पदुकोणच्या साइड पोज दाखवणारा सीन काढून टाकण्याचे आदेशही बोर्डाने दिले आहेत. गाण्यातल्या भगव्या बिकिनीवरही हिंदू संतांनी आक्षेप घेतला. अहमदाबादमध्ये शाहरुख आणि दीपिकाच्या बॅनर्सचीही तोडफोड करण्यात आली
या सगळ्यामध्ये कमाल राशीद खान (Kamal R Khan) म्हणजेच केआरकेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुस्लिम समाजातील लोक शाहरुख खानला ‘बॉलिवुडचा किंग’ नसून ‘बदनामीचा किंग’ म्हणत आहेत. एवढेच नाही तर एका गृहस्थाने शाहरुखची किंमत 10 रुपये आहे असेही बोलले आहे. केआरकेने हा व्हिडिओ शेअर करताना शाहरुखचे समर्थन केले आणि या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
मात्र, खुद्द कमाल राशिद खान ‘पठाण’ आणि शाहरुख खान – दीपिका पदुकोण यांना ट्रोल करत होता. ‘पठाण’ रिलीज होण्यापूर्वीच त्याने पठाणला आपत्ती म्हटले होते. मात्र हा व्हिडिओ शेअर करत तो आता शाहरुख खानला पाठिंबा देत आहे. केआरकेने एका चॅनलची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘कॅमेऱ्यासमोर लोक शाहरुख खानला अशा प्रकारे शिव्या देत असतील तर ते पूर्णपणे चूकीचे आहे. आणि माध्यमांनी अशा लोकांना दाखवू नये.”
It’s totally unfair if people are abusing #SRK like this on camera. And media people should not record such language. pic.twitter.com/onYKg1BaxM
— KRK (@kamaalrkhan) January 6, 2023
शाहरुख खानची काढली लायकी:
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शाहरुख खानबद्दल बोलताना ऐकू येत आहे, “किस पैश्यांनी बनलाय तो? त्याची लायकी 10 रुपयांची आहे. त्याची किंमत 10 रुपयेही नाही. पठाण बोलून तो पठाण झाला का? निदान पठाणांसारखी छोटीशी गोष्ट तर सांग. ही नग्नता कोणत्याही धर्मात नाही. जर त्याने त्याच्या आईला, बहिणीला त्याच्या मांडीवर घेऊन फोटो काढला तर मानल मी त्याला.”
शाहरुख खान बदनामीचा बादशहा:
तो माणूस पुढे म्हणाला, “तो कशाचा राजा आहे, तो बदनामीचा राजा आहे. देशाचे रक्षण करणारे राजे असतात, त्यांना काय कारवाई होणार याची रात्रंदिवस भीती असते. आणखी एका मुस्लिम व्यक्तीने चित्रपट आणि शाहरुखबद्दल सांगितले, “शाहरुख खान खरा मुस्लिम नाही.” कारण इस्लाममध्ये चित्रपट हा गुन्हा मानला जातो.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर का दिली आईने फरहान अख्तरला घराबाहेर काढण्याची धमकी? वाचा मनोरंजक किस्सा
जरा दमानं! ऐश्वर्याने भर कार्यक्रमात सर्वांपुढे अभिषेकसोबत केले होते फ्लर्ट; रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद










