Friday, April 10, 2026
Home मराठी दुःखद! प्रसिद्ध संगीतकार आणि वादक निर्मल मुखर्जी यांचे निधन

दुःखद! प्रसिद्ध संगीतकार आणि वादक निर्मल मुखर्जी यांचे निधन

प्रसिद्ध आणि लोकप्रिय संगीतकार आणि वादक निर्मल मुखर्जी यांचे निधन झाले आहे. मुंबईमधील हिरानंदानी रुग्णालयात वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात सध्या दुखत असून, अनेक संगीतकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. निर्मल मुखर्जी यांचे प्रत्येक गणेशोत्सवात वाजवले जाणारे ‘चिकमोत्याची माळ..’ हे गाणे तुफान लोकप्रिय झाले. आजही हे गाणे दरवर्षी गणपतीच्या दहा दिवसात प्रत्येकाच्या कानी पडत असते. या गाण्याला निर्मल यांनी अरविंद हळदीपूर यांच्यासोबत मिळून संगीत दिले होते.

निर्मल मुखर्जी यांना १७ जानेवारी रोजी हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय गाण्यांना संगीत दिले. जवळपास प्रत्येक वाद्यावर त्यांची मजबूत पकड होती. त्यांच्या मागे त्याची पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांनी संगीत क्षेतार्तील सर्वच दिग्गज लोकांसोबत काम केले होते. त्यांचा या क्षेत्रात मोठा दबदबा होता. अनु मलिक, जतीन-ललित, पंचमदा, राजेश रोशन, बप्पी लाहिरी, नौशाद विशाल-शेखर, मदन-मोहन, कल्याणजी-आनंदजी, नदीम-श्रवण, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, अरविंद हळदीपूर आदी अनेक संगीतकारांकडे त्यांनी बोंगो, कोंगो, तुंबा, दरबुका, डी-जेंबे, पखवाज ही वाद्ये वाजवली आहेत. ऱ्हिदमिस्ट असलेल्या निर्मल यांची कोंगोवर हुकुमत होती. अरविंद-निर्मल या जोडीने ‘ग गणपतीचा…’ आणि ‘आले देवाचे देव गणराज…’ हे अल्बम खूप गाजले.

निर्मल मुखर्जी यांनी वयाच्या १० व्या वर्षी वंदन क्षेत्रात पाऊल टाकले होते. त्यांचे वडील निर्माते होते. त्यांच्यावर संगीताचा मोठा प्रभाव होता. वयाच्या केवळ १४ व्या वर्षी ते संगीत असोसिएशनचे सदस्य देखील बनले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकता कपूर लवकरच तिच्या खास अंदाजमध्ये करणार ‘या’ सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा?

‘भोला’नंतर पुन्हा ‘या’ सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर दिसणार अजय आणि तब्बूची सुपरहिट जोडी

हे देखील वाचा