Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ

राखी सावंत सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी राखीने पती आदिल खान दुर्रानी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती, ज्यामुळे आदिल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यातील मतभेद हळूहळू दूर होत आहे. नुकतीच राखी सावंतने शर्लिन चोप्राची माफीही मागितली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पॅपराझींने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दोन्ही अभिनेत्री मीडियासमोर मिठी मारताना दिसत आहेत. दरम्यान राखी सावंत म्हणाली, ‘शर्लिन माझी खूप जुनी मैत्रीण आहे. मधे आमच्यात काहीतरी घडले यात शंका नाही. पण, मी माझ्या बहिणीची माफी मागते. आय लव यू.’ यावर शर्लिन राखीला विचारते, ‘छोटी बहीण की मोठी बहीण? यास प्रतिउत्तरास राखी म्हणते समवयक’, ज्यानंतर दोघेही मिठी मारताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडिओवर युजर्सकडून अनेक मनोरंजक कमेंट येत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘मैत्री खरी असेल तर लोकांसमोर सिद्ध करण्याची गरज नाही.’, तर दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘ही सीरिजसारखी आहे, जी नेटफ्लिक्सवर असावी.’ अशात एका युजरने लिहिले की, ‘कालपर्यंत ते एकमेकांना खायला धावत होते आणि आज स्वर्थासाठी एकमेकांशी जोडले आहेत. असेच कुठेतरी आदिलचीही माफी तर मागणार नाही ना?’

राखी आणि शर्लिनचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये दोघेही एकत्र केक कापताना दिसत आहेत. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत आहे की, आता सर्व कटुता दूर झाली आहे. काही दिवसांपूर्वी शर्लिनने राखीविरुद्ध तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याची तक्रार दाखल केली होती, ज्यानंतर पोलिसांनी राखीला चौकशीसाठी बोलावले होते. आता दोघंही पुन्हा चांगले फ्रेंड बनल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.(dramaqueen rakhi sawant apologises to sherlyn chopra for past differences seals friendship with hugs kisses video viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अंगावर फक्त बेडशीट अन् हातात कॉफी, ‘बिग बॉस 16’ फेम प्रियांकाचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल

चाळिशी पार करणाऱ्या अभिनेत्रीने भर थंडीत बिकिनीत घालून वाढवले तापमान, युजर्सही म्हणाले, ‘यार ये कितनी…’

हे देखील वाचा