Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली! रणबीर-श्रद्धाचे नवीन गाणे ‘शो मी द ठुमका’ रिलीज, पाहा व्हिडिओ

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कार‘ मधील ‘शो मी द ठुमका‘ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. हे तेच गाणे आहे, ज्याची एक झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. हे गाणे काही वेळापूर्वीच निर्मात्यांनी रिलीज केले असून माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

रणबीर (ranbir kapoor) आणि श्रद्धा कपूर (shraddha kapoor) यांच्या साडेतीन मिनिटांच्या या गाण्यात रणबीरला नाचताना पाहून तुम्हाला ‘ये जवानी है दीवानी’ हे गाणे नक्कीच आठवत असेल, तर दुसरीकडे श्रद्धा तिच्या सडपातळ कंबरेने सर्वांना वेड लावताना दिसत आहे. पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली श्रद्धा जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हे गाणे सुनिधी चौहान आणि शाश्वत सिंग यांनी गायले आहे, तर या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांचे आहेत. यापूर्वी या चित्रपटातील ‘प्यार होता कै बार’ हे गाणे रिलीज झाले होते.

लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटातील ही जोडी रुपेरी पडद्यावर काहीतरी वेगळं करून दाखवेल, असा चाहत्यांचा विश्वास आहे. या चित्रपटात रणबीर कपूर पहिल्यांदाच अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. हा चित्रपट आधी बायोपिक असल्याचे सांगण्यात आले होते, पण रणबीर कपूरने सांगितले की, ‘हा त्याचा बायोपिक नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

‘तू झुठी मैं मक्कार’मध्ये रणबीर कपूरसोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि आयशा रझा मिश्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तू झुठी मैं मक्कार मधून स्टँड-अप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.(bollywood actor ranbir kapoor and shraddha kapoor new song show me the thumka released )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सोनू निगम’सोबत झालेल्या भांडणावर स्वप्नीलच्या बहिणीचा मोठा खुलासा, सांगितले घटनेचे सत्य

श्रीदेवी नव्हती देत बोनी कपूर यांना भाव, मग अशी लढवली शक्कल; आपल्यापेक्षा 8 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत थाटला संसार

हे देखील वाचा