करीनावरही भारी पडला ‘अनुपमा’चा एकच ठुमका, ‘बेबो’च्या गाण्यावर रुपालीने केला जबरदस्त डान्स

‘अनुपमा’ या मालिकेतून अभिनेत्री रुपाली गांगुली ही घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची जोरदार पसंती मिळाली आहे. शोमध्ये ती ‘अनुपमा’ हे पात्र साकारत आहे. तिचा सोशल मीडियावर भलामोठा चाहतावर्ग आहे. ती यावर खूप सक्रिय असते आणि तिच्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला चाहत्यांची जोरदार पसंती मिळत आहे.

अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रुपाली डान्स (Rupali Ganguly Dance Video) करताना दिसत आहे. या व्हिडिओत तिचे एक्सप्रेशन्स पाहण्यासारखे आहेत. तिची प्रत्येक अदा चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. डान्स करताना ती हसतानाही दिसत आहे.

रुपाली ‘चमेली’ या सिनेमातील ‘भागे रे मन’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हे गाणे गायिका सुनिधी चौहान हिने गायले आहे. रुपाली डान्स करण्यासोबतच लिप सिंकदेखील करत आहे. तिने आपल्या दमदार डान्सने या गाण्याला चार चाँद लावले आहेत. व्हिडिओत दिसते की, रुपालीने तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि तिने कोणताही मेकअप केला नाहीये.

रुपाली झाली आऊट ऑफ कंट्रोल
रुपालीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “मनावर कोणतेही नियंत्रण नाही.” रुपालीचा हा डान्स व्हिडिओ पाहून दिसते की, तिचे तिच्या मनावर कोणतेही नियंत्रण राहिले नाहीये. गाण्याच्या तालावर रुपाली थिरकताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rups (@rupaliganguly)

करीना कपूर खानशी होतेय तुलना
चाहते रुपाली गांगुलीच्या या व्हिडिओला खूपच पसंती देत आहेत. चाहते तिच्या सुंदरतेसोबतच डान्सचेही कौतुक करत आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ६ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ७५ हजार लाईक्स मिळाले आहेत. तिच्या व्हिडिओवर चाहते ‘गॉर्जियस’ आणि ‘सुंदर’ अशा कमेंट करत आहेत. एकाने तर कमेंट करत लिहिले की, “सकाळ यापेक्षा चांगली होऊच शकत नाही.” विशेष म्हणजे, चाहते तिची तुलना ‘चमेली’ सिनेमातील अभिनेत्री करीना कपूर हिच्याशी करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
संस्कार हो दुसरं काय! आर माधवनने रजनीकांत यांचे पाय शिवत घेतला आशीर्वाद, सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद
चंकी पांडेच्या लेकीला ‘सपाट छातीवाली’ म्हणत ट्रोल करायचे लोक, वेदना सांगताना हळहळली अभिनेत्री
‘सर्व शक्ती पणाला लावावी लागेल’, बॉलिवूड सिनेमांबाबत असे का म्हणाला करण जोहर? जाणून घ्याच

Latest Post