मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनयासोबतच आपला दागिन्यांचा व्यवसाय उत्तम पद्धतीने सांभाळणाऱ्या प्राजक्ताचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अभिनय, सूत्रसंचालन, कवियत्री आता उद्योजिका अशा सर्वच माध्यमांमध्ये यशस्वीरीत्या काम करणाऱ्या प्राजक्ताला मोठी फॅन फॉलोविंग आहे. सध्या अभिनयापासून लांब असूनही सतत सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या प्राजक्ताच्या फॅन्सची मोठी फौज आहे. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. अशातच तिने नुकताच तिचा एक सुंदर आणि रेखीव फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो आणि या फोटोवर आलेली कमेंट सध्या तुफान गाजत आहे.
प्राजक्ता माळीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिने पिळवल्या रंगाचा फुलांची डिझाइन असलेला लेहेंगा घातला आहे. यावर तिने गळ्यात मोत्याचा आकर्षक सेट आणि कानात नाजूक टॉप्स घातलेले दिसत आहे. यात ती अतीव सुंदर दिसत असून हा फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये “न जाने क्या हुआ…जो तूने छू लिया..। खिला गुलाब की तरह……” या ओली लिहिल्या आहेत. यावर तिच्या फॅन्सने आणि कलाकारांनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे. अशातच एका फॅनच्या कमेंटने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर कमेंट करत एकाने तर तिला थेट लग्नाची मागणीच घातली आहे. त्याने त्याच्या कमेंटमध्ये लिहिले आहे, “व्वा प्राजु तू गुलाबी गुलाबासारखी दिसतेस आणि माझे हृदय सुंदर गुलाबासारखे केले आहेस आणि मला तुझ्याबद्दल वेड लावले आहे. प्राजू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि गुलाबापेक्षाही खूप सुंदर आहे आणि तुझा गुलाबासारखा सुंदर चेहरा जागा झाला आहे. माझ्या हृदयात आणि आयुष्यात तुझ्यावर खूप प्रेम आहे प्रिय…” यासोबतच त्याने काही ईमोजी देखील पोस्ट केले आहेत.
प्राजक्ता माळीने या कमेंटला जरी उत्तर दिले नसले तरी इतर अनेकांनी मात्र त्यावर भरभरून कामनेत केल्या आहेत. सध्या प्राजक्ताचा हा फोटो आणि त्यावर आलेली ही कमेंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाण्याची शूटिंग केल्यानंतर ‘या’ करण्यासाठी रात्रभर रडल्या होत्या स्मिता पाटील
‘मी खरंच माफी मागतो’ देवमाणूस फेम एकनाथ गीते यांची ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल