‘भाग्य दिले तू मला’ या मासिकेने कमी वेळात चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. त्या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मुख्य भूमिका साकाराली आहे. त्यांच्या या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिकेत तन्वी मुंडले, विवेक सांगळे, निवेदिता सराफ, अमित रेखी, जान्हवी किल्लेकर, पूर्वा फडके, सौरभी भावे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या केल्या आहेत. या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने खलनायिकेची भूमिका साकारली आहे.
खलनायिकेचे हे पात्र साकारून जान्हवीने (jahnavi killekar) घराघरात ओळख निर्माण केली आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ती या मालिकेत साडीमध्ये दिसते. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडतो. पण आता जान्हवीनी तिच्या लूकवरून सध्या चर्चेत आला आहे. तिने बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
जान्हवी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. पोस्ट शेअर करून जान्हवी चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या पोस्टवर चाहते देखील लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. नुकतेच तिने स्विमिंग पूलमधील तिचा हा व्हिडिओ शेअर केले आहेत. जान्हवी लोणावळ्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जान्हवीने शॉर्ट ड्रेस घातला आहे. त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.
View this post on Instagram
जान्हवीच्या या व्हिडिओवर कमेंट करताना युजरने लिहिले की, “ताई, साडीतच राहा हे नको करुस…” दुसऱ्याने लिहिले की, “प्लीझ साडीतले रिल्स शेअर करा” तर आणखी काहीजण म्हटले की, “भर पावसाळ्यात वणवा पेटवला..” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा बोल्ड लूक काही लोकांना आवडत आहे.
अधिक वाचा-
–ऋतुजा बागवेच्या आईने लेकीच्या लग्नाबद्दल केले भाष्य; म्हणाल्या, ‘…तू लग्न नाही केलं तरी चालेल’
–“आम्ही नक्कीच त्यांना तुमच्यापेक्षा…” गश्मीर महाजनीने ट्रोलिंगवर शेअर केली ‘ती’ पोस्ट म्हणाला…









