बिग बॉस मराठीचे चौथे पर्व चांगलेच गाजले. या पर्वातील अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांची जोडी देखील त्यातून प्रसिद्धीच्या झोतात आली. बिग बाॅसच्या घरात प्रसाद आणि अमृताची चांगली मैत्री झाली होती. त्यामध्ये त्या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. त्या दोघांची या पर्वातील केमस्ट्री आता खऱ्या आयुष्यातही सत्यात उतरली आहे.
नुकतेच आता प्रसाद (Prasad Jawade) आणि अमृताचे (Amrita Deshmukh) काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचे हे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. त्या दोघांचा साखरपुडा झाला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. तसेत त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख देखील जाहिर केली आहे.
पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही साखरपुडा केला आहे. आम्ही दोघांनीही आयुष्यभर एकत्र एका टीममध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता आमच्या मार्गात येणारे कोणतेही कार्य पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत” त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
प्रसाद आणि अमृता येत्या 18 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतेच शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रसादने गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर अमृताने पांढऱ्या रंगाचा ट्रेडिनशल ड्रेस परिधान केला आहे. अमृता आणि प्रसादच्या हातात अंगठी घालत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. (Amrita Deshmukh and Prasad Jawade secretly made love to each other)
अधिक वाचा-
–बाबो!!! अल्लू अर्जुनकडून ‘पुष्पा 2’चा डायलॉग लीक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
–नाकातून गातो म्हणून टीकेचा धनी ठरणाऱ्या हिमेशला ‘भाईजान’ने दिलेला पहिला ब्रेक, 120सिनेमांना दिलंय संगीत