सुरभी ज्योती हि एक टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तर तिने जून 2026 मध्ये तिला पहिले मूल होणार असल्याचे सांगत तिने तिच्या चाहत्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी शेअर केली. सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे हा खास क्षण शेअर केला आहे. पोस्ट मध्ये तिने गोड फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती आणि तिचा पती सुमित सुरी एकत्र बसलेले दिसत आहेत. फोटोमध्ये, दोघांच्या पायाजवळ लहान बाळाचे बूट आहेत, जे त्यांच्या येणाऱ्या छोट्या पाहुण्याला सूचित करत आहे.
सुरभीने (Surabhi)या फोटो पोस्ट सोबत एक भावनिक कॅप्शन लिहिले आहे. तिने लिहिले आहे, कि “आमचे सर्वात मोठे साहस सुरू होत आहे. या जूनमध्ये छोटेसे आमचे प्रेम येत आहे.” या एका ओळीने तिने तिच्या चाहत्यांची मने जिंकली. पोस्ट शेअर होताच सोशल मीडिया अभिनंदनाचे कमेंट येवू लागले. चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये हृदयाचे सिम्बॉल देत शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी लिहिले की ते सुरभी आणि सुमितसाठी या नवीन प्रवासासाठी खूप आनंदी आहेत
तिचे चाहते तिच्या जुन्या पोस्टवर सतत कमेंट करत होते कारण सुरभी काही काळापासून सोशल मीडियापासून दूर होती. आता, तिने तिच्या गरोदरपणाची बातमी कळवत अनुपस्थितीचे कारण स्पष्ट केले आहे. हि आनंदाची बातमी सांगितल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुरभीने ही घोषणा करताच, तिच्या मित्रमैत्रिणींनी आणि इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. मौनी रॉय आणि अनिता हसनंदानी यांच्यासह अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी तिच्या पोस्टवर प्रेमळ संदेश शेअर केले. चाहते आणि टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्सनीही या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर 2024 मध्ये सुमितने सुरभीशी लग्न केले. जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील एका सुंदर रिसॉर्टमध्ये त्यांचे लग्न डेस्टिनेशन वेडिंग केले होते
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली श्रेयस तळपदेसह अन्य 12 जणांविरुद्ध FIR दाखल


