आज-काल ओटीटी वर मालिका चित्रपट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. आणि त्यामध्ये ही आणि कॅटेगरी आता उपलब्ध आहे जसे की हॉरर, फॅमिली टाईप, मनोरंजक, सस्पेन्स थ्रिलर असे प्रकार आता उपलब्ध आहेत. त्यातला त्यात हॉरर चित्रपटांचा क्रेझ आजकाल जास्त दिसून येतो. प्रेक्षक घर बसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून नवनवीन चित्रपट मालिका पाहू शकतात. असाच एक लघुपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे, जो केवळ मोठ्या बजेटच्या चित्रपटांनाच मागे टाकत नाही. आणि ott वर टाॅप करत आहे.
हा 2 तास 20 मिनिटांचा चित्रपट आहे. तर या चित्रपटाचे नाव ‘युथ’ आहे. हा एक मूळतः तमिळ चित्रपट आहे. 19 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, तो 16 एप्रिल 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. तर हा चित्रपट आता सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. तर या चित्रपटाच्या दमदार पटकथेमुळे हा चित्रपट लोकप्रिय होत आहे.
‘युथ‘ (youth)हा बहुप्रतिक्षित चित्रपट मूळतः तमिळमध्ये बनवला असला तरी चित्रपटाची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन, तो हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या पाच प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रेक्षकांनी त्याच्या कथेची इतकी प्रशंसा केली आहे की त्याला IMDb वर 7.1 चे प्रभावी रेटिंग मिळाले आहे. ‘युथ’या चित्रपटाचे 6 कोटी रु मर्यादित बजेट होते, तरीही या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तब्बल 52.26 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जागतिक स्तरावर, या चित्रपटाने 71.33 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
OTT वर अॅक्शन-थ्रिलरचा महासंगम, ‘प्रतिछाया’पासून 24 पर्यंत या आठवड्यात होतील रीलीज










