कौतुकास्पद! महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते अभिनेत्री रुपाली भोसले सन्मानित; मिळाला २०२१ चा ‘युथ आयकॉन अवॉर्ड’


मराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही एक ट्रेडिंग मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र लेखकाने उत्कृष्टरित्या रेखाटले आहे. यातीलच नकारात्मक भूमिका साकारणारी संजना अर्थातच अभिनेत्री रुपाली भोसले होय. रुपाली नकारात्मक भूमिकेत असूनही प्रेक्षकांमध्ये तिचा चांगलाच दबदबा आहे. रुपाली ही ‘मराठी बिग बॉस २’ ची स्पर्धक होती. त्यानंतर तिच्या चाहत्या वर्गात कमालीची भर पडली आहे. तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे रुपाली भोसलेला २०२१ चा युथ आयकॉन अवॉर्ड मिळाला आहे.

रुपाली भोसलेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “युथ आयकॉन अवॉर्ड २०२१ हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते स्वीकारताना.” या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रुपालीने पारंपरिक लूक केला आहे. तिने गुलाबी रंगाची साडी घातली आहे. तसेच नाकात नथ, केसात गजरा, कपाळी टिकली, हातात बांगड्या असा सर्व साज-शृंगार केला आहे. तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत तिचे अभिनंदन करत आहेत.

रुपाली ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक बोल्ड अभिनेत्री आहे. तिचा फॅशन सेन्स देखील खूप चांगला आहे. बिग बॉसच्या घरात असताना तिने वेळोवेळी प्रेक्षकांना तिच्या फॅशन सेन्सचे दर्शन दिले आहे. (Rupali bhosale recieved a 2021 yuth icon award from governer of Maharashtra)

तिने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘कन्यादान’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘महासंग्राम’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘आयुषमान भव:’, ‘कसमे वादे’, ‘बडी दूर से आये हैं’, ‘तेनाली रामा’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; आता पायलट बनून अभिनेता जिंकणार रसिकांची मनं

-राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ झाला प्रदर्शित; चित्रपटावर होणार परिणाम?

-आर्ची अन् परश्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार एकत्र?? फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा


Leave A Reply

Your email address will not be published.