[rank_math_breadcrumb]

‘थेट कारवाई केली जाईल…’ अमृता खानविलकरने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या दिला इशारा

अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि हिमांशू मल्होत्रा गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून ते घटस्फोट घेणार असल्याची जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळापासून सुरू आहे. अमृताने या अफवा निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावल्या आहेत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अशा अफवा पसरवणाऱ्यांना इशाराही दिला आहे.

अभिनेत्री अमृताच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये, तिच्या कायदेशीर टीमने असे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

अमृताच्या कायदेशीर टीमने ही नोंद शेअर करताना लिहिले आहे की, “अधिकृत कायदेशीर निवेदन – १० ऑगस्ट २०२६ पासून प्रभावी. आमच्या निदर्शनास आले आहे की, काही ऑनलाइन, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर अमृता खानविलकर आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निराधार मजकूर पसरवला जात आहे.

हे बदनामीकारक असून तिच्या गोपनीयतेचे उल्लंघन आहे.” त्यात पुढे म्हटले आहे की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला जात असला तरी, अमृता खानविलकरबद्दल बदनामीकारक विधाने, अफवा, पडताळणी न केलेले आरोप किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी या स्वातंत्र्याचा कोणताही गैरवापर गंभीरपणे पाहिला जाईल

उपलब्ध पुराव्यांद्वारे जिथे जिथे याची पुष्टी होईल, तिथे लागू कायद्यानुसार, असा मजकूर तयार करणाऱ्या, पसरवणाऱ्या किंवा शेअर करणाऱ्या जबाबदार व्यक्ती, संस्था किंवा संघटनांवर योग्य कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल. योग्य कायदेशीर कारवाईसाठी अशा सर्व प्रकरणांवर लक्ष ठेवले जात आहे आणि त्यांची नोंद ठेवली जात आहे.”

लोकप्रिय मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर हिने २०१५ मध्ये हिमांशू मल्होत्रासोबत लग्न केले. या जोडप्याची भेट २००४ मध्ये झाली होती आणि २०१५ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ते बराच काळ नात्यात होते.

हेही वाचा

टॅाक्सिकच्या ट्रेलरमध्ये पत्नी कियारच्या अभिनयावर फिदा सिद्धार्थ, मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक