Wednesday, September 23, 2026
Home बॉलीवूड इम्रान हाश्मी आणि जिनिलिया दिसणार रोमँटिक अंदाजात, ‘गनमास्टर जी९’ चे गाणे प्रदर्शित

इम्रान हाश्मी आणि जिनिलिया दिसणार रोमँटिक अंदाजात, ‘गनमास्टर जी९’ चे गाणे प्रदर्शित

इम्रान हाश्मी ( Imraan  hashmi) आणि जेनेलिया देशमुख यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘गनमास्टर जी9’ या चित्रपटातील ‘अफसाना बनाया आपने’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात इम्रान हाश्मी आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. हे गाणे हिमेश रेशमिया आणि असीस कौर यांनी गायले आहे. या गाण्याचे बोल हिमेश रेशमिया यांनीच लिहिले असून, त्यांनीच संगीतही दिले आहे.

अलीकडेच, इम्रान हाश्मीने ‘गनमास्टर जी9’ मधील पहिले गाणे ‘अफसाना बनाया आपने’चा टीझर इन्स्टाग्रामवर पोस्ट करून या गाण्याच्या प्रदर्शनाची घोषणा केली होती. एका दिवसानंतर, आज हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याला यूट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ दोन तासांतच या गाण्याला ३,००,००० व्ह्यूज मिळाले आहेत.

‘गनमास्टर जी9’ चित्रपटातील हे गाणे विशेष आहे, कारण अभिनेता इम्रान हाश्मी आणि गायक हिमेश रेशमिया बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. हे गाणे चाहत्यांना २००५-२००६ च्या काळात परत घेऊन जात आहे. त्या दिवसांत इम्रान हाश्मी आणि हिमेश रेशमिया संगीत विश्वात धुमाकूळ घालत होते.

२५ ऑगस्ट रोजी ‘गनमास्टर जी९’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. इम्रानने या टीझरने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. या १ मिनिट २२ सेकंदांच्या टीझरमध्ये हा अभिनेता रोमँटिक आणि ॲक्शन अशा दोन्ही अवतारात दिसला.

हेही वाचा

एक ना एक दिवस हे नक्की घडेल, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने यामी गौतम भावुक

हे देखील वाचा