Sunday, June 22, 2025
Home मराठी तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देतेय अमृता खानविलकर; तिच्या योगा पोझेस पाहून नेटकरी झाले प्रभावित

तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देतेय अमृता खानविलकर; तिच्या योगा पोझेस पाहून नेटकरी झाले प्रभावित

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव बनली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय राहते. ‘चोरीचा मामला’ फेम अमृता सध्या तिच्या फिटनेसबाबत लाईमलाईटमध्ये आहे. अमृताच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फॅशन आणि डिझायनर साड्यांव्यतिरिक्त जिम आणि व्यायामाचेही बरेच फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतील. यावरून सहज लक्षात येते की, ती तिच्या फिटनेसबद्दलही खूप गंभीर आहे.

नुकताच तिने शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात अभिनेत्री तिच्या योगा प्रशिक्षिकेसोबत योगा करताना दिसत आहे. यात ती तिच्या योगा प्रशिक्षिकेप्रमाणे अगदी हुबेहुब स्टेप्स करत आहे. योगा करताना तिचे संतुलन आणि पोझेस अगदी पाहण्यासारखे आहे.

हा व्हिडिओ अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. जो सोशल मीडिया युजर्सकडून चांगलाच पसंत केला जात आहे. यात तिचा योगा पाहून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता की, कशाप्रकारे चाहते तिच्या कौतुकांचे पूल बांधत आहेत.

अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच सचिन कुंडलकरच्या ‘पाॅंडिचेरी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत वैभव तत्ववादी, महेश मांजरेकर आणि सई ताम्हणकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ या हिंदी चित्रपटांतून तिने, बॉलिवूडमध्येही खास ओळख निर्माण केली आहे. विविध प्रकारच्या दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अमृता स्वत: ला भाग्यवान मानते. तिला मराठी आणि हिंदी दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करायला आवडते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादववर गुन्हा दाखल; महिलांबद्दल अश्लील गाणे बनवल्याचा आरोप

-‘ये परदा हटा दो’ गाण्यावरील मानसी नाईकच्या एक्सप्रेशन्सवर तिचा पतीही झाला फिदा; कमेंट करत म्हणतोय, ‘ये चांद…’

-उर्वशीच्या पोटात एका व्यक्तीने दणादण मारल्या बुक्क्या; त्रास होत असूनही अभिनेत्रीने गपगुमान केले सहन

हे देखील वाचा