बॉलिवूडच्या ग्लॅमर जगात सुंदर दिसण्यासोबतच फिट असणे देखील तितकेच आवश्यक आहे. यासाठी अभिनेत्री आणि अभिनेते अतिशय मेहनत घेत असतात. कडक डायट, दररोज व्यायाम यामुळेच आपले आवडते कलाकार आपल्याला पडद्यावर इतके फिट आणि फाईन दिसतात. हे कलाकार त्यांच्या व्यायामाचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
झरीन खान सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एका अभिनेत्री आहे. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत असते. नुकताच झरीन खानने तिचा फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. झरीनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, झरीन खान रफ एँड टफ व्यायाम अगदी सहजपणे करताना दिसत आहे.
झरीनने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले की, “वीकेंड डन राइट”. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आले आहेत. सोबतच तिचे फॅन्स आणि सेलिब्रिटी देखील हा व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्स करत आहे. काही दिवसांपूर्वीच झरीनचा ‘मशहूर हैं तू’ हा अल्बम प्रदर्शित झाला होता.
सन २०१० साली झरीनने सलमानसोबत ‘वीर’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमाने जरी सरासरी कामगिरी केली असली, तरीही झरीनने चांगलीच लोकप्रियता मिळवली. ‘कॅटरिना कैफसारखी दिसते’, असे झरीनबद्दल नेहमी बोलले जाते. झरीनला पहिल्या सिनेमातून जी लोकप्रियता मिळाली ती लोकप्रियता तिला सिनेमे यशस्वी करण्यात पुरेशी ठरली नाही.
झरीनने तिच्या करिअरमध्ये अतिशय मोजक्या सिनेमांमध्ये काम केले. त्यात ‘हाउसफुल 2’, ‘हेट स्टोरी 3’, अक्सर 2, 1921 आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातले एखाद दोन चित्रपट वगळता सर्व सिनेमे फ्लॉप ठरले आहे. झरीनने तिचा मोर्चा पंजाबी आणि दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळवला. मात्र, तिथेही तिला अपेक्षित यश आले नाही. झरीनने काही दिवसांपूर्वीच कॅटरिना कैफमुळे माझे करिअर खराब झाल्याचे सांगितले होते. झरीनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर नुकताच तिचा प्रिन्स नरुलासोबतचा एका अल्बम प्रदर्शित झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नुसता राडा! पवन सिंगच्या ‘पुदिना ए हसीना’ गाण्यावर शिवानी सिंगचे जोरदार ठुमके, व्हिडिओ व्हायरल
-गुलाबी साडीत ‘जलेबी बाई’ बनून थिरकली आलिया भट्ट, डान्स व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल