Wednesday, May 20, 2026
Home कॅलेंडर ‘या’ चित्रपटाच्या शूटींग दरम्यान गंभीर दुखापत झाल्याने अभिनेता जॉन अब्राहम रुग्णालयात दाखल

‘या’ चित्रपटाच्या शूटींग दरम्यान गंभीर दुखापत झाल्याने अभिनेता जॉन अब्राहम रुग्णालयात दाखल

बॉलिवूडचा हँडसम ऍक्टर म्हणजे जॉन अब्राहम. बॉलिवूडचा हार्टथ्रोब म्हणून त्याला ओळखले जाते. जॉन अब्राहम हा उत्तरप्रदेश मध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मात्र तो या शूटिंग दरम्यान जखमी झाल्याची बातमी आली आहे. जॉन सध्या त्याचा ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाचे शूटिंग उत्तरप्रदेश मधल्या विविध ठिकाणी करत आहे. त्याचवेळी तो जखमी झाला आहे.

‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाचे शूटिंग मागील काही दिवसांपासून लखनऊ मध्ये सुरु होते. तिथले शूटिंग संपल्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम वाराणसीला शूटिंगसाठी पोहचली. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी जॉन अ‍ॅक्शन सीन करत असताना जखमी झाला आहे. सीन झाल्यानंतर काही वेळाने त्याला खूप त्रास जाणवायला लागला. म्हणून चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यावरच थांबवण्यात आले आणि जॉनला हॉस्पिटलमध्ये नेले गेले.

जॉनच्या डाव्या हाताला इजा झाली आहे. या दुखापतीनंतर डॉक्टरांनी त्याच्या हाताचा एक्स-रे देखील काढला. या एक्स-रे मध्ये कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं आढळून आलं आहे. फक्त पुढील काही दिवस त्याला आराम करावा लागणार आहे. जॉननं रुग्णालयात सुमारे एक तास घालवला.

John Abraham
John Abraham

उपचारानंतर जॉनला घरी सोडण्यात आले असून काळजीचे काही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जॉन अब्राहम हॉस्पिटलमध्ये आल्याचे समजताच हजारो लोकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. या गर्दीतून वाट काढत त्याला हॉस्पिटलमधून बाहेर नेले गेले.

चित्रपट निर्मात्यांनी वाराणसीमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगसाठी चार दिवसाचे वेळापत्रक निश्चित केले आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम हटके लूकमध्ये दिसणार आहे. त्याला भगतसिंग सारखा लूक या सिनेमात दिला आहे. ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटाच्या समोर आलेल्या पोस्टमध्ये त्याने खांद्यावर नांगर धरला आहे. त्याच्या शरीरावर अनेक जखमा देखील दिसत आहेत. सोबत ‘जिस देश की मैय्या गंगा है, वाहा खून भी तिरंगा है’ असे लिहलेले दिसत आहे.

‘सत्यमेव जयते २’ हा जॉनचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्यमेव जयते’ सिनेमाचा सिक्वल आहे. या सिनेमात जॉन सोबत दिव्या खोसला कुमार, मनोज बाजपेयी, अनूप सोनी, हर्ष छाया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा पुढच्या वर्षी २ में २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हे देखील वाचा