Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मराठी पोरी, लयच भारी!’, म्हणत सर्व बॉयफ्रेंड्सला शालूने धरलं धारेवर; पाहा व्हिडिओ

‘फँड्री’ मध्ये झळकलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात या दिवसात खूप चर्चेत असते. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर तिचा चांगलाच वावर असतो. तिची फॅन फॉलोविंग देखील तगडी आहे. इंस्टाग्रामवर तिला तब्बल जवळपास दीड लाखापेक्षाही अधिक युजर्स फॉलो करतात. म्हणूनच की काय, तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात.

नुकताच राजेश्वरीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने सर्व प्रियकरांना चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून येत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, कशाप्रकारे ती त्यांना खडेबोल सुनावत आहे. “बाकीच्या मुलींचे किती नखरे असतात, अपेक्षा असतात. मात्र मराठी मुलींना फक्त तुमच्याकडून एक प्रेमाचा कॉल हवा असतो,” असे ती या व्हिडिओमध्ये म्हणत आहे.

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. चाहते यावर मजेदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. शिवाय यावर लाईक्सचाही पाऊस पडत आहे. अवघ्या काही तासातच या व्हिडिओने २० हजाराहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. तसेच व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मराठी पोरी, लयच भारी!”

काही दिवसांपूर्वी राजेश्वरीने राखी सावंतच्या ‘ड्रीम मे एन्ट्री’ या गाण्यावर एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये ती या गाण्यावर थिरकताना दिसली होती. यातील तिच्या अदा अक्षरशः भुरळ पाडणाऱ्या होत्या. हा व्हिडिओला देखील चाहत्यांनी खूप प्रेम दिले. सोबत लाईक्सचा वर्षाव केला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा