Sunday, September 27, 2026
Home › मराठी › ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनाया ‘याच्या’वर करतेय जीवापाड प्रेम; गोड फोटो आला समोर

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनाया ‘याच्या’वर करतेय जीवापाड प्रेम; गोड फोटो आला समोर

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बरीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेचे नाव घेतले तर गुरुनाथ, राधिका आणि शनायाची आठवण येते. यातील हे मुख्य पात्र प्रचंड गाजले. यातील शनाया अर्थातच अभिनेत्री रसिका सुनीलच्या चाहत्यांमध्ये देखील खूप वाढ झाली. तरुण मंडळीकडून तिला विशेष प्रेम मिळत असतं. अर्थातच तरुणांमध्ये रसिकांची खूप क्रेझ आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मात्र हा तरुणवर्ग ज्या रसिकाच्या प्रेमात आहे, ती रसिका तर इतर कोणावर तरी प्रेम करते.

होय, सर्वांची लाडकी शनाया इतर कोणाच्या तरी प्रेमात वेडी आहे. नुकताच तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे आणि तिच्या आयुष्यातील प्रेमाबद्दल खुलासा केला आहे. आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की, ती व्यक्ती कोण आहे? मात्र ती व्यक्ती नसून, तो एक प्राणी आहे. हा तिचा पाळीव कुत्रा आहे, जिच्यावर रसिका खूप प्रेम करते.

रसिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती तिच्या कुत्र्याला प्रेम करताना दिसली आहे. सोबत तिने कॅप्शनमध्ये “माझ्या आयुष्यातील प्रेम”, असे लिहिले आहे. रसिकाचा हा फोटो तिच्या चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे. चाहते त्यावर भरभरून प्रेमही व्यक्त करत आहेत. तसेच यावर लाईक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे. (majhya navryachi bayko fame rasika sunil shared photo of love of her life)

रसिकांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘पोश्टर गर्ल्स’ मधून चित्रपटात पदार्पण केले होते. तर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मध्ये भूमिका साकारत टीव्हीच्या जगात पाऊल ठेवले. तिने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॉप’, ‘गॅट मॅट’ आणि ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय रसिका ‘तुम बिन मोहे’ या अल्बम गाण्यातही झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा