Friday, June 20, 2025
Home अन्य ‘पोटापाण्यासाठी बाहेर जावे लागते ना’, म्हणत हिंदुस्थानी भाऊने एअरपोर्टवर दिली पॅपराजींच्या प्रश्नांची उत्तरे

‘पोटापाण्यासाठी बाहेर जावे लागते ना’, म्हणत हिंदुस्थानी भाऊने एअरपोर्टवर दिली पॅपराजींच्या प्रश्नांची उत्तरे

कोरोनामुळे शूटिंग बंद होती, आणि त्यामुळे कलाकार देखील त्यांच्या सुट्टीच्या किंवा सक्तीच्या सुट्टीची मजा घेत होते. मात्र, जसा कोरोनाचा संसर्ग कमी व्हायला सुरुवात झाली आणि सर्व शूटिंग पुन्हा सुरू झाल्या, तेव्हापासून विमानतळावर कलाकारांचे दर्शन व्हायला सुरुवात झाली आहे. विमानतळावरून अनेक कलाकारांचे व्हिडिओ सध्या समोर यायला लागले आहे. तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहेत.

नुकतेच विमानतळावर सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठकचे दर्शन झाले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल भयानीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पॅपराजींनी भाऊला अनेक प्रश्न विचारले. यावेळी भाऊचा मूड चांगला दिसला आणि त्यानेदेखील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

“पोटापाण्यासाठी बाहेर जावे लागते ना,” असे म्हणताना तो दिसला आहे. त्याला पॅपराजींनी विचारले की, “लस घेतली का?” यावर भाऊ म्हणाला, “घेतली. संपूर्ण जग घेते, तर आपल्यालाही घ्यावी लागेल ना. आपण सुद्धा या देशात राहतो.” सोबतच त्याने पॅपराजींना देखील स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला.

यूट्यूबर असणारा हिंदुस्थानी भाऊ हा त्याच्या यूट्यूबवरील व्हिडिओमुळे संपूर्ण जगात ओळखला जातो. त्याने हिंदी ‘बिग बॉसच्या १३’ व्या पर्वात देखील सहभाग नोंदवला होता. त्यानंतर त्याला अफाट लोकप्रियता मिळाली. आज तो यूट्यूब आणि सोशल मीडियावरील व्हिडिओसाठी ओळखला जातो. हिंदुस्तानी भाऊचा पाकिस्तान विरोधातील व्हिडिओही सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल होतात. त्याचे अनेक मीम्सही व्हायरल होत असतात. त्याचे व्हिडिओ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत.

तसे पाहिले, तर हिंदुस्थानी भाऊ हा राजकीय नेता आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. मात्र, त्याला खरी ओळख त्याच्या यूट्यूबवरील व्हिडिओंमुळेच मिळाली. त्याचे ‘आदित्य युवा प्रतिष्ठान’ नावाचे एक एनजीओ देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा