Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड सुहानाने स्विमिंग पूल जवळील हॉट फोटो केले शेअर; आई गौरीने केले क्लीक, तर शाहरुख म्हणतोय, ‘हा दिखावा आहे…’

सुहानाने स्विमिंग पूल जवळील हॉट फोटो केले शेअर; आई गौरीने केले क्लीक, तर शाहरुख म्हणतोय, ‘हा दिखावा आहे…’

सोशल मीडियावर कलाकार जेवढे सक्रिय असतात तेवढेच स्टारकिडही असतात. स्टार किड्समध्ये नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी आणि चर्चेत असणारी स्टारकिड म्हणजे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान होय. सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. मित्रांसोबत फिरताना एन्जॉय करताना ती फोटो शेअर करत असते. अशातच सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्याला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत आहे.

सुहाना खानने सोशल मीडियावर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुहाना स्विमिंग पूलच्या जवळ बसलेली आहे. यात तिने पांढरा रंगाचा स्लिव्हलेस टॉप आणि ब्ल्यू डेनिम शॉर्ट्स घातले आहेत. तसेच केस मोकळे सोडले आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात कोल्ड ड्रिंकचे कॅन दिसत आहे.

हे फोटो शेअर करून सुहानाने कॅप्शन दिले आहे की, “दाखवा की हि एक पेप्सी आहे आणि मी एक सिंडी क्रॉफर्ड आहे.” या फोटोमध्ये तिने वेगवेगळ्या पोझ दिलेल्या दिसत आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तिचे अनेक चाहते या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. यातील खास गोष्ट म्हणजे सुहाना खानचे वडील म्हणून बॉलिवूड किंग खान शाहरुख खानने देखील तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “मी असा दिखावा करू शकतो का? की, ही तू आहेस आणि कोला अचानक घडलेली घटना आहे आणि तरीही फोटोंचे कौतुक करतो.” सुहानाने शेअर केलेले हेच फोटो तिची आई गौरी खानने देखील पोस्ट केले आहेत. (Shahrukh Khan’s daughter Suhana khan’s latest photo viral on social media)

बॉलिवूडमध्ये अजून प्रवेश देखील केला नाही. पण तिचे फॅन फॉलोविंग कोणत्या कलाकारापेक्षा कमी नाहीये. तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. मागच्या वर्षी तिने तिचे सोशल मीडिया अकाऊंट सार्वजनिक केले आहे. त्यानंतर तिची फॅन फॉलोविंग खूप वाढले आहे. सुहानाला तिच्या बोल्ड फोटोमुळे अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेक वेळा ती तिच्या मैत्रिणींसोबत स्पॉट होत असते. शनाया कपूर, अनन्या पांडे आणि नव्या नंदा या सुहानाच्या खास मैत्रिणी आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा पहिल्यांदा तुटले होते नुपूर सेननचे हृदय; मन हलके करत म्हणाली, ‘मला रात्री एक वाजता…’

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खान नाही, तर ‘हा’ कलाकार करणार ‘बिग बॉस १५’ होस्ट

-मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

हे देखील वाचा