सध्या सोशल मीडिया हे सर्वांच्या हक्काचे स्थान झाले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करत असतात. अशातच मराठी तसेच बॉलिवूड अभिनेत्री मिथिला पालकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या बोल्ड अदांनी सध्या सोशल मीडियावर आग लावली आहे. अशातच तिने पुन्हा एकदा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मिथिलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मिथिला अत्यंत हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये तिने काळ्यी रंगाची मोनोकनी परिधान केली आहे. तसेच त्यावर एक जॅकेट घातले आहे. पायात हाय हिल्स घालून तिने अत्यंत बोल्ड पोझ दिल्या आहेत. त्यात तिच्या कुरळ्या केसांनी तिच्या लुकमध्ये आणखीनच भर घातली आहे. तिच्या या बोल्डनेसने सर्वांना वेड लावले आहे. तिचे चाहते सातत्याने या फोटोवर कमेंट करून तिच्या सौंदर्याचे वर्णन करत आहेत. यावर अनेक कलाकारांनी देखील कमेंट केली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या या फोटोवर “ओ बास बास” अशी कमेंट केली आहे. तसेच तिचे चाहते देखील कमेंट करत आहेत. (Mithila palkar share her bold photos on Instagram)
मिथिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागील काही दिवसात ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजोलसोबत स्क्रीन शेअर करत होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळाली होती. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी मिथिला ही एक आहे. मिथिलाने तिच्या करिअरची सुरुवात ‘वरुण नार्वेकर’ यांच्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटातून केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांनी काम केले आहे. यासोबतच तिने २०१४ मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.
तिने २०१८ मध्ये इरफान खानसोबत ‘कारावां’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील या दोघांच्या आंबट गोड केमिस्ट्रीने सगळ्यांना खूप हसवले तसेच भावनिक देखील केले. तसेच तिने ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-









