Saturday, March 14, 2026
Home कॅलेंडर का मागावी लागली निशिगंधा वाड यांना माफी? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

का मागावी लागली निशिगंधा वाड यांना माफी? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

मराठी कलाविश्वातील सुंदर, सोज्वळ अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड. निशिगंधा यांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकांतून त्यांची त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवले. निशिगंधा वाड अचानक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्या काही दिवसांपूर्वी एका वादात सापडल्या होत्या.

अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या यूट्यूब चॅनेलवरच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात निशिगंधा वाड यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या करिअर, पर्सनल लाइफसोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. समलैंगिक संबंध या मुद्द्यावर देखील त्यांनी त्यांचे मत मांडले. त्यांच्या याच विषयावर असलेल्या मतांना लोकांनी विरोध केला. त्यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यावेळी त्या LGBTQ समुहाबद्दल बोलताना म्हणाल्या, ‘निसर्गाच्या विरोधात जाणारा प्रवास हा मला पचनी पडत नाही. समलिंगी संबंधांबद्दल माझं मत थोडं वेगळं आहे. आजकालच्या तरुण पिढीला वाटतं, हाऊ कॅन यू कॉन्ट्रॅडिक्ट? तुम्ही नॉर्मल नाही आहात का? या व्यक्तींचे जसे मानवाधिकार आहेत तसे त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलांचेही मानवाधिकार आहेतच ना? ते आई –वडील म्हणून कोणाची ओळख करुन देणार?’

त्यांच्या या वक्तव्यानंतर समलिंगी असणाऱ्या बाबी समलिंगी लोकांना पाठिंबा देणाऱ्या लोकांनी निशिगंधा यांना विरोध करत त्यांच्या माफीची मागणी केली. हा विरोध वाढत असतांनाच निशिगंधा यांनी, “LGBTQ समूह किंवा कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पण जर माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते. मी सामाजिक क्षेत्रात काम करते. तसेच तृतीयपंथीयांसोबतही काम करते. कोणावरही आरोप करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. गे असणं किंवा लेस्बियन असणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्या संदर्भात मी कधीच बोलू शकत नाही. होमोफोबिया अशी माझी मनोवृत्तीदेखील नाही” असे म्हणत निशिगंधा वाड यांनी माफी मागितली आहे.

निशिगंधा वाड म्हणजे अतिशय हुशार आणि आह्यसु व्यक्तिमत्व असून त्यांनी भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका याविषयात पीएच.डी. मिळवली आहे.

हे देखील वाचा