Tuesday, June 24, 2025
Home मराठी आहा भारीच की! क्रॉप टॉप अन् जीन्समध्ये मानसी दिसतेय एकदम कडक

आहा भारीच की! क्रॉप टॉप अन् जीन्समध्ये मानसी दिसतेय एकदम कडक

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘आयटम गर्ल’ अशी जिची ओळख आहे ती म्हणजे सर्वांची लाडकी मानसी नाईक. मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री आहे. तसेच सोशल मीडियावर देखील तिचा खूप वावर असतो. सोशल मीडियावर तिचे अनेक डान्स व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. तिचे चाहते देखील तिच्या या व्हिडिओला भरभरून पसंती देत असतात. लग्न झाल्यापासून ती चित्रपटसृष्टीपासून जरी लांब असली, तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांशी जोडून असते. तिच्या पतीसोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना त्या दोघांची केमिस्ट्री देखील खूप आवडते. अशातच मानसीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

मानसीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मानसीने केशरी रंगाचा टॉप आणि जीन्स घातली आहे. या फोटोमध्ये ती दिलखेचक पोझ देताना दिसत आहे. तिचे हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/CTKBIktoJvg/?utm_medium=copy_link

 

मानसीने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. चाहते सातत्याने या फोटोंवर कमेंट करत आहेत. चाहते सातत्याने हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत. तिच्या या फोटोला आता २२ हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. (marathi actress manasi naik share her photos on social media)

मानसी नाईकने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तिचा पती प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे.

मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने चित्रपटात आणि गाण्यावर डान्स केला आहे. तिने ‘जबरदस्त’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘टारगेट’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’, ‘असं वाजवा की’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

हे देखील वाचा