भारतावरचे कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असले तरी अजून पूर्णपणे संपलेले नाही. पूर्वीइतके कोरोनारुग्ण आढळत नसले तरी काही प्रमाणात अजूनही रुग्ण आहेच. बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे अशातच वरुण धवनच्या ‘ऑक्टोबर’ चित्रपटातील बिटिश नायिका बनिता संधु नुकतीच कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. त्यामुळे तिला कोलकात्याच्या एका खाजगी रुग्णालयात भरती कण्यात आले आहे. तत्पूर्व बनिताने सरकारी रुग्णालयात उपचार घ्यायला नकार दिला होता.
बनिता सध्या कोलकाता इथे ‘कविता अँड टेरेसा’ सिनेमाचे चित्रीकरण करत आहे. सोमवारी तिने करोना चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. बनिता २० डिसेंबर रोजी कोलकाता येथे विमानाने आली होती. तिच्या याच विमानातून म्यूटेन्ट करोना व्हायरसने बाधित तरुणाने प्रवास केला होता. त्यामुळे बहुतेक याच प्रवासात तिला करोनाची लागण झाल्याचा संशय प्रशासनाला आहे.
सुरुवातीला बनिता ऍम्ब्युलन्स मधून बाहेर येण्यास तयारच नव्हती. हॉस्पिटलमध्ये काही त्रुटी असल्याचे सांगत तिने ऍडमिट होण्यास नकार दिला. हॉस्पिटल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार त्यांनी लगेचच राज्य सचिवालय आणि आरोग्य विभागाला याबद्दल माहिती दिली की, ती ऍम्ब्युलन्स मधून बाहेर येत नसून तिला तिथून जायचे आहे’. त्यानंतर ब्रिटिश हाय कमिशनला देखील याबद्दल कल्पना देण्यात आली. तिचे असे जाणे नियमानुसार नसल्याने यात पोलिसांना देखील हस्तक्षेप करावा लागला. मग काही काळाने तिथल्या एका मोठ्या डॉक्टरांनी तिला समजावल्यानंतर ती खाजगो रुग्णालयातून उपचार घेण्यास तयार झाली.










