टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता असणाऱ्या सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने संपूर्ण देश दुःखात बुडाला आहे सर्च जणं त्याच्या जाण्यामुळे दुःख व्यक्त करत आहे. गुरुवारी (२ सप्टेंबर) बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाने शेवटचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूने फक्त टेलिव्हिजनवरील नाही तर बॉलिवूडमधील कलाकार सुद्धा दुःखात आहेत. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर अनेक लोक सोशल मीडियावर ‘दिल से दिल तक’ या मालिकेतील त्याची सह-कलाकार रश्मी देसाई हिला जोरदार ट्रोल करत आहेत.
????
— Rashami Desai (@TheRashamiDesai) September 2, 2021
रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला यांनी जवळपास तीन वर्ष एकत्र काम केले आहे. त्या दोघांमध्ये अनेक वादविवाद झाले होते. आता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर सगळेजण सोशल मीडियावर त्यांचे दुःख व्यक्त करत आहेत. यातच रश्मीने देखील ट्विटर अकाउंटवर ट्वीट केले होते. परंतु तिच्या या ट्वीटमध्ये सिद्धार्थचे नाव कुठेही नव्हते. तिने केवळ तुटलेल्या हृदयाची ईमोजी पोस्ट केली होती
Ha rashmi ki kahi huyi baat sach huyi …shame on you rashmi….kitana bhi insan kharab hi usko mar jaa.ya marne ki badua nhi deni chahiye……
— Vinayak Ruptakke (@RuptakkeVinayak) September 2, 2021
Now you happy?? Bhot pareshn kiya h tumne usko dnt show us fake love
— Monika Verma (@monikaverma_now) September 2, 2021
रश्मि देसाई कभी भी किसी के लिए ग़लत शब्दों का इस्तेमाल नहीं करना चाहिए।आज सिद्धार्थ शुक्ला नहीं रहा लेकिन बिग बॉस में जो तुमने उसके लिए ग़लत इस्तेमाल किए थे वो आज भी सभी को याद आ रहे होंगे वो इंसान जिससे कभी प्यार किया हो उसे तो कभी भी नही। आज इस बात का मलाल तुम्हें भी बहुत होगा
— Suman Gusain Bisht (@GusainBisht) September 2, 2021
रश्मीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील अशाच ईमोजी पोस्ट केल्या होत्या. परंतु नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केले आहे. अनेकजण रश्मीने बिग बॉसमध्ये केलेल्या वक्त्यव्याचा सिद्धार्थच्या मृत्यूशी संदर्भ जोडत आहे. अनेकजण तिला सिद्धार्थच्या मृत्यूला जबाबदार ठरवत आहेत. एवढंच नाही तर सोशल मीडियावर तिला टॅग करून बिग बॉसमध्ये तिने बोलल्या गोष्टीची आठवण करून देत आहेत.
Hai bhagwan u people r really disgusting!!!He also said aisi ladki waisi ladki ..they had a cordial relation after that. Even Rashami dance with him in the show. What do you need?People say many things in anger.Some say I will kill you in anger,do they really kill!!
— Dhruba (@DhrubaC2) September 2, 2021
बिग बॉसच्या घरात जाण्याआधीच सिद्धार्थ आणि रश्मी यांच्या नात्यात कटुता होती. यातच बिग बॉसमध्ये त्या दोघांचे अनेक वाद झाले. त्यांनी एकमेकांवर अनेक प्रश्न उभे केले होते. एकदा त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं होतं. त्यावेळी रागात रश्मी म्हणाली होती की, “हा व्यक्ती पाण्याशिवाय मरायला जरी लागला तरी मी त्याला पाणी देणार नाही तशीच मरू देईल.” तिने बिग बॉसमध्ये बोलल्या या वाक्याला नेटकरी आता सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करत आहेत.
एका युजरने रश्मीच्या ट्वीटला रीट्वीट करून लिहिले आहे की, “माणूस कितीही वाईट का असेना पण त्याने दुसरी व्यक्ती मरावी अशी प्रार्थना करायला नको.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “तू त्याला शोमध्ये खूप त्रास दिला होता आता खोटं खोटं प्रेम दाखवू नकोस ” आणखी एका युजरने लिहिले आहे की, “रश्मी कधीच कोणासाठी चुकीचे शब्द वापरायचे नाही. आज सिद्धार्थ शुक्ला आपल्यात राहिला नाही पण बिग बॉसमध्ये तू त्याच्यासाठी वापरलेले शब्द सगळ्यांना आठवत आहेत. या गोष्टीचे आज तुलाही खूप वाईट वाटत असणार.”
Are you mad???? Wo ek show tha???????????? tum Kabhi gusse mein Kuch Nehi bolti kea??? Yaad Karo kitni Baar Tumne Kitna galat Bola kitno logo ko???????????????? past ko mat uthao ????????tum jese logo ki Wajese ajj negativity itna hai????agar Sid ki supporter ho na to pray Karo ajj ????ungli mat uthao
— Mamma's Boy (@RahulOf21631817) September 2, 2021
तर अनेकजण सोशल मीडियावर तिच्या बिग बॉसमधील वक्त्यव्याचे समर्थन करत आहेत. अनेकजण असे म्हणत आहेत की, माणूस रागात असे काही बोलून जातो. एका युजरने तिचे समर्थन करत लिहिले आहे की, “सिद्धार्थसाठी तरी अशी नकारात्मकता पसरवू नका. ती देखील आता दुःखात आहे. तिला असे बोलून सिद्धार्थ आता परत येणार नाहीये.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “तो केवळ एक शो होता. आता मोठे व्हा.” तर आणखी एकाने लिहिले आहे की, “सगळ्यांनाच दुःख झाले आहे. त्याच्या मृत्यूने कोणालाही आनंद झाला नाही. अनोळखी व्यक्तीला देखील वाईट वाटले आहे, मग ते दोघे तर एके काळी चांगले मित्र होते. त्यामुळे तिला आता खूप वाईट वाटत आहे.”
Sometimes life gets complicated but today was a reminder that there’s something bigger than all of us. Words don’t make sense anymore. My heart breaks as I type this – rest in peace #SidharthShukla ???????????????????????????? Om shanti ???????????? pic.twitter.com/UTuit7wBdz
— Rashami Desai (@TheRashamiDesai) September 2, 2021
सगळ्या नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवून रश्मीने स्वतःला सांभाळले आहे. यानंतर तिने सिद्धार्थसोबतचा बिग बॉसमधील एक फोटो ट्वीट केला. हा फोटो शेअर करून तिने लिहिले की, “कधी कधी आयुष्य गुंतागुंतीचे होते. पण आज ही गोष्ट समजली की, आपल्यापेक्षाही कोणीतरी मोठं आहे. शब्दांना आता काहीही अर्थ उरला नाही. माझे हृदय तुटत आहे. त्यामुळे मी हे लिहीत आहे. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो सिद्धार्थ शुक्ला.”
रश्मीने केलेल्या या ट्वीटला देखील नेटकरी ट्रोल करत आहेत. तसेच ती सगळं खोटं खोटं नाटक करत आहे. असे म्हणत आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’
-कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल










