Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

खास मित्रासह अंडरवॉटर मजा करताना दिसली ‘सोनू’; बिकिनी लूकने तर सर्वांनाच केलंय चकित

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय शोच्या बाल कलाकारांना चाहते खूप पसंत करतात. प्रेक्षकांनी ही मुले लहानपणापासूनच मोठी झालेली पाहिली आहेत. अभिनेत्री निधी भानुशाली, जी शोचा भाग होती, म्हणजेच जुनी ‘सोनू’ देखील प्रेक्षकांची लाडकी आहे. अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या ऍडव्हेंचर लाइफचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच निधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा निराळा अवतार पाहायला मिळाला आहे.

गोवामध्ये केली खूप मस्ती
वास्तविक, निधी भानुशालीचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ निधीचा मित्र Ryora Lights याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. निधी या व्हिडिओमध्ये एकदम बिनधास्त अंदाजात दिसत आहे. हा व्हिडिओ गोवा ट्रीपचा आहे, जिथे तिने तिच्या मित्रांसोबत खूप मजा केली. तिचा खास मित्र Ryora Lights सोबत तिने अंडरवॉटरही भरपूर पाणी मजा केली. तसेच, यावेळी निधीचा बिकिनी अवतार पाहायला मिळाला. (taarak mehta ka ooltah chashmah fame nidhi bhanushali underwater masti with special friend)

निधी भानुशालीने वेगवेगळ्या बिकिनी आणि बोल्ड आउटफिट्सद्वारे व्हिडिओमध्ये आग लावली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या व्हिडिओमध्ये तिच्या संपूर्ण गोवा ट्रीपची मजा दाखवण्यात आली आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या या मित्रासोबत निधी अनेकदा अशा ट्रीपवर जात असते. रोड ट्रीपला देखील ती याच मित्रासोबत गेली होती. या व्हिडिओमध्ये निधीच्या बोल्ड अवतारासह हिप्पी अवतार देखील दिसला आहे. 

निधी भानुशाली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये आत्माराम भिडेची मुलगी सोनालिका अर्थात सोनूची भूमिका साकारत होती. सोनू ही टप्पू सेनामधील सर्वात हुशार सदस्य आहे. आता पलक सिधवानी हे पात्र साकारत आहे. निधी आणि पलक यांच्या आधी झील मेहता हे पात्र साकारत होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयासह आयुष्मानने गिरवलेत पत्रकारितेचेही धडे; तर ‘हे’ आहे अभिनेत्याचं खरं नाव

-रिलायन्स एन्टरटेन्मेंट अन् टी- सीरिजमध्ये मोठी भागीदारी; हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून बनवणार ‘हे’ १० चित्रपट

-‘आली गवर आली, सोनपावली आली…’, मानसी नाईकने जल्लोषात केले गौराईचे स्वागत

हे देखील वाचा