मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये संस्कृती बालगुडे हिचा समावेश होतो. टेलिव्हिजनवरून आपल्या करिअरला सुरुवात करणारी संस्कृती आज मराठी चित्रपटसृष्टीतील मागणी असणारी अभिनेत्री झाली आहे. अनेक चित्रपटात काम करून तिने तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोणतीही भूमिका असो तिने तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. अगदी साध्या भूमिकेपासून ते अगदी मॉर्डन आणि बोल्ड भूमिका तिने निभावल्या आहेत. सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर वाढला आहे. अशातच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
संस्कृतीने अलीकडेच इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला आहे. यासोबत तिने गळ्यात सुंदर नेकलेस घातला आहे. तसेच नेकलेसला मॅचिंग ईअरिंग घातले आहेत. तसेच कपाळी टिकली लावली आहे. तिने केसांमध्ये गजरा माळलेला देखील दिसत आहे. या फोटोत ती ड्रेससोबत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress sanskruti balgude share her new photos on social media)
हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “कहूॅं भी गुलाबी, मैं सहूॅं भी गुलाबी, लगता है मैं रहूॅं गुलाबी रे.” तिच्या या फोटोचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “साक्षात अप्सरा अवतरलीये.” आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तिची तऱ्हा असे जरा निराळी.” अशाप्रकारे या फोटोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संस्कृती ही मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘पिंजरा’ या मराठी मालिकेपासून केली होती. त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम मिळाले आहे. तिने ‘रे राया’, ‘लग्न मुबारक’, ‘शॉर्टकट: दिसतो पण नसतो’, ‘शिव्या’, ‘निवडुंग’, ‘भय’, ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात काम केले आहे.
याआधी ती शेवटची ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती, तर लवकरच ती ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ. निखिल राजेशिर्के असे कलाकार काम दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘रंग माझा वेगळा’ मालिकेने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्पा, कलाकारांनी ‘अशा’प्रकारे साजरा केला खास क्षण
-ड्रग्ज प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला मिळाला जामीन, पण कोर्टाने दिल्या ‘कडक’ सूचना
-कृष्णा अभिषेकने असे काय केले की, नेहा कक्करला कोसळले रडू? पाहा ‘हा’ व्हिडिओ