‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) ही मालिका चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत अनेक वळणं आली आहेत. सुरुवातीला ही मालिका अत्यंत सुंदर चालली होती. त्यामुळे या मालिकेकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या, परंतु मध्यंतरी ओम आणि स्वीटूचे लग्न मोडले आणि प्रेक्षक निराश झाले. ओमची बहीण मालविका हिने सगळं प्लॅनिंग करून त्यांचे लग्न रद्द करून मोहित आणि स्वीटूचे लग्न लावून दिले होते. तसेच, मोहितकडून स्वीटूच्या भावाचा म्हणजेच चिन्याचा अपघात देखील घडवून आणला होता.
परंतु अशातच एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यावरून समजते की, मालविकाने (Malvika) केलेल्या सगळ्या पापाचा घडा फुटणार आहे. मालविकाला तिच्या व्यवसायात देखील खूप मोठे नुकसान झाले आहे. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये मालविकाला पोलिसांनी अटक केलेल्या सीनची शूटिंग होताना दिसत आहे. (Bigg twist in yeu kashi tshi mi nandayala, malika’s truth reveals in front of family members )
याआधी मालविका तिचा सगळ्या गेम मोहितवर उलटवते आणि त्याला गच्चीवरून खाली पाडत असते, परंतु तिथे स्वीटू येते आणि मोहितला वाचवते. त्यानंतर तिच्या घरातील सगळे येतात. तसेच तिने केलेल्या सगळ्या गुन्हाबाबत तिला अटक करत असतात. यावर मालविका सगळ्यांचे पाय धरून माफी मागते आणि असं करू नका म्हणते. हा व्हिडिओ पाहून आता येणारे एपिसोड खूपच रंजक असणार आहेत, याची माहिती मिळत आहे.
या मालिकेत स्वीटूची भूमिका अभिनेत्री अन्विता फलटणकर निभावत आहे, तर ओमची भूमिका शाल्व किंजवडेकर निभावत आहे. त्या दोघांची जोडी सर्वत्र लोकप्रिय आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुम्ही किंग आहात आणि किंग सारखंच राहायचं’, पत्नीकडून उत्कर्ष शिंदेला मिळाली सकारात्मक ऊर्जा
–‘मन झालं बाजिंद’ मालिकेतील राया कृष्णाला घेऊन जाणार बुलेटवर ‘भुरुम भुरुम’, व्हिडिओ पाहाच
-‘मैदान मार’ गाण्यातून श्रेयश जाधवने व्यक्त केली देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती कृतज्ञता










