Thursday, July 23, 2026
Home अन्य ‘मन झालं बाजींद’मधील कृष्णा देखील थिरकली सजना ट्रेंडवर, व्हिडिओ पाहाच

‘मन झालं बाजींद’मधील कृष्णा देखील थिरकली सजना ट्रेंडवर, व्हिडिओ पाहाच

झी मराठीवरील सगळ्याच मालिका सध्या गाजत आहेत. प्रत्येक मालिकेची कहाणी काही वेगळी आणि दैनंदिन जीवनाशी संबंधीत आहे. यातील ‘मन झालं बाजींद’ मालिका चांगलीच गाजत आहे. मालिकेची शूटिंग गावाकडील आहे. तसेच डायलॉग आणि वेशभूषा देखील गावाकडील आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. मालिकेतील सगळीच पात्र वेगळी आहेत.

अशातच मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी श्वेता राजन सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेत ती कृष्णा हे पात्र निभावत आहे. तिची भूमिका सगळ्यांना खूप आवडत आहे. श्वेता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. (shweta rajan dance video viral on social media)

श्वेताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती सोशल मीडियावरील ट्रेंडिंग गाणे ‘सजना’र डान्स करताना दिसत आहे. ती या गाण्याच्या डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहे. तिने गाण्यात हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. अनेकांना तिचा हा डान्स व्हिडिओ खूप आवडला आहे. तिचे चाहते या व्हिडिओवर सातत्याने कमेंट करून तिचे कौतुक करत आहे.

‘मन झालं बाजींद’ मालिकेतील तिचे पात्र अनेकांना खूप आवडत आहे. अत्यंत जिद्दी, शिक्षणाची आवड असणाऱ्या मुलीचे पात्र या मालिकेत दाखवले आहे. परंतु शिक्षण आणि स्वप्न या यामध्ये अनपेक्षितपणे तिचे लग्न होते आणि तिची स्वप्न बाजूला राहतात. लग्न झाल्यावर देखील ती एक सून आणि बायको म्हणून सगळी कर्तव्य पार पाडते. तिची ही भूमिका सगळ्यांना खूप आवडत आहे. याआधी तिने ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत छोटे पात्र निभावले होते.

हेही वाचा :

बॉलिवूडच्या नवीन जोड्या वयातील अंतर सोडत आहेत मागे, पडद्यावर खुलून करणार रोमान्स

‘या’ व्यक्तीने बिग बॉस फेम अर्शी खानच्या पोटात मारला जोरदार पंच, विव्हळत कोसळली खाली

तर ‘या’ कारणामुळे अभिनेत्री सोहा अली खान होती इतके वर्ष अभिनयापासून लांब

 

हे देखील वाचा