Saturday, September 26, 2026
Home › बॉलीवूड › ‘थोडी लाज बाळगा मॅडम’, म्हणत ट्रोलर्सने घेतली मलायकाच्या ‘त्या’ फोटोवरून तिची शाळा

‘थोडी लाज बाळगा मॅडम’, म्हणत ट्रोलर्सने घेतली मलायकाच्या ‘त्या’ फोटोवरून तिची शाळा

बॉलिवूडमधील अतिशय हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणून मलायका अरोराला ओळखले जाते. मलायका सध्या सिनेसृष्टीपासून लांब असली तरी ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. विशेष म्हणजे बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमुळे ती सतत चर्चेत विषय ठरते. अभिनेत्रीने कोणताही फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या फोटोला लाईक्स आणि कमेंट तर मिळतातच मिळतात, तिचे फोटो तेवढेच ट्रेंड सुद्धा होतात. अभिनेत्री मलायकाने नुकताच तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. ज्यामधून तिचे अप्रतिम आणि आकर्षक व्यक्तिमत्व समोर येत आहे. आपल्या स्टाईल स्टेटमेंटने चर्चेत आलेल्या मलायकाने शेअर केलेले फोटो पाहिल्यानंतर काही लोकं संतापली आणि मलायका अरोरा पुन्हा एकदा ट्रोल झाली.

मलायका अरोराने पोस्ट केलेल्या बोल्ड फोटोमध्ये तिच्या मादक आणि बोल्ड अदा तिचा लूक अधिकच लक्षवेधी ठरवत आहे. मलायकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने नारंगी रंगाचे ब्रालेट आणि काळ्या रंगाच्या शॉर्ट्समध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये ती स्विमिंग पुलच्या बाजूला बसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले ‘संडे सनी साइड अप.’ पुलाजवळ बसलेली मलायका सूर्यापासून व्हिटॅमिन डी घेत असताना तिचा चेहरा आणि तिची बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

तिने जसा तिचा फोटो शेअर केला तसे लगेचच, तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट्स करण्यास सुरुवात केली. मलायका अरोराचा बॉयफ्रेंड असलेल्या अर्जुन कपूरने देखील तिच्या फोटोला लाईक करत कमेंटमध्ये लिहिले की, “कॅप्शन छान आहे.” काही लोकं फोटो पाहून तिचे कौतुक करत आहे तर काही लोकं फोटो पाहून नाराज होत असून, तिला ट्रोल करत आहे. मलायका जेव्हा पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एकाने लिहिले की, ‘थोडी लाज बाळगा.’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘किमान आज हा फोटो पोस्ट केला नसता तर?’ अजून एका युजरने लिहिले की, ‘आरआयपी लतादी आज तरी थांबल्या असत्या मॅडम.’

Photo Courtesy: Instagram/malaikaaroraofficial

परंतु, लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीनंतर मलायकाने किमान आज तरी अशा पोस्ट टाकायला नको होत्या, असे काही लोकांचे मत आहे, त्यामुळे लोक आता तिला ट्रोल करत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा