Saturday, March 15, 2025
Home अन्य शाॅकिंग! प्रसिद्ध गायिकेचा रहस्यमय मृत्यू, घरातच आढळलाय मृतदेह

शाॅकिंग! प्रसिद्ध गायिकेचा रहस्यमय मृत्यू, घरातच आढळलाय मृतदेह

सोमवारी (७ फेब्रुवारी) सोनीपतमध्ये एकच खळबळ उडाली, जेव्हा एका हरियाणवी गायिकेच्या मृत्यूची बातमी समोर आली. खरं तर, सोमवारी हरियाणवी गायिका सरिता चौधरी (Sarita Choudhary) हिचा मृतदेह, तिच्याच घरी संशयास्पद परिस्थितीत सापडला होता. यानंतर आसपासच्या संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

गायिका सरिता चौधरी सोनीपतच्या सेक्टर १५मध्ये राहत होती. तसेच ती प्राथमिक शाळेत मुख्य शिक्षिका म्हणून काम करत होती. सरिताच्या मृत्यूच्या बातमीने तिच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. (Singer sarita choudhary death dead body found in her own apartment)

सरिता चौधरीचा भाऊ सनी याने सांगितले की, रविवारी (६ फेब्रुवारी) संध्याकाळी उशिरा सरिताशी बोलणं झालं होतं. पण सकाळी ती फोन उचलत नव्हती. अशा स्थितीत ती बाथरूममध्ये किंवा मंदिरात असेल, असे त्याला वाटले. मात्र त्यानंतर दुपारपर्यंत सरिताने फोन उचलला नाही, तेव्हा सनीने शेजाऱ्यांना फोन केला आणि त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर दरवाजा तोडला असता खोलीतील बेडवर सरिताचा मृतदेह आढळून आला. त्याचबरोबर कुटुंबाने कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. सरिता चौधरी सध्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती आणि तिला दोन मुले आहेत.

सरिता चौधरीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडल्याची माहिती मिळताच, सोनीपत सेक्टर २७ पोलीस हरियाणवी गायिका सरिता चौधरीच्या घरी पोहोचले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असलेले अधिकारी कुलदीप दहिया यांनी सांगितले की, सेक्टर १५ मधील एका घराच्या खोलीत मृतदेह पडून असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. सध्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

‘माझे स्वप्न अपूर्ण राहिले’, लता दीदींबद्दल बोलताना ‘हा’ चित्रपट निर्माता भावूक

जेवढ्या चांगल्या सवयी तितका यशस्वी माणूस! असा होता लता मंगेशकर यांचा दिनक्रम

…म्हणून कॅटरिना कैफने थेट दाबला सलमान खानचा गळा, पाहा संपूर्ण व्हिडिओ

हे देखील वाचा