बॉलिवूड अभिनेता फरदीन खान त्याच्यात झालेल्या मोठ्या ट्रान्स्फॉर्मेशनमुळे मधल्या काळात खूपच चर्चेत आला होता. अनेक वर्ष लाईमलाईटपासून लांब राहिल्यानंतर त्याने त्याच्या जबरदस्त कमबॅकची तयारी सुरु केली आहे. यासाठी त्याने सगळ्यात आधी त्याच्या फिटनेसकडे लक्ष दिले आणि स्वतःचा पूर्ण लूक बदलला. सिनेसृष्टीतून गायब झाल्यानंतर फरदीन खूपच जाड झाला होता. मात्र आता त्याने त्याचे वजन कमी केले आहे. त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्याचे नवीन फोटो पाहून तर त्याचे चाहते हैराण झाले होते. वजन कमी करण्यासोबतच त्याने त्याच्या हेअर स्टाईलमध्ये देखील खूप बदल केलेला दिसला.
फरदीन खानला काही महिन्यांपूर्वी एका सलूनच्या बाहेर स्पॉट केले गेले. त्याला पाहून मीडियाच्या सर्व कॅमेऱ्यांनी त्याला पटापट आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. त्यानंतर फरदीन खूपच ट्रेंड झाला. त्याच्या समोर आलेल्या फोटोंमध्ये त्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता. सोबतच सलूनच्या आतमधील काही फोटो देखील समोर आले होते. हे फोटो पाहून चाहत्यांना फरदीनला ओळखणे देखील कठीण झाले होते. त्याचा हा फोटो हेअर स्टायलिश आलिम हकीम याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला होता. या फोटोत अलीमने फरदीनचे मागून आरश्यापुढे बसलेला फोटो काढला होता.
या फोटोतील फरदीनचा अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला. सगळेजण त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचे खूप कौतुक करत होते. लवकरच फरदीन ‘विस्फोट’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. याच कारणांमुळे तो त्याच्या लूक्सकडे आणि फिटनेसकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. सन २०२० मध्ये एका मुलाखतीत फरदीनने त्याचे १८ किलो वजन कमी केल्याचे सांगितले होते. त्याने सांगितले होते की, फिटनेस आल्यावर त्याला स्वतःला २५ वर्षाचे असल्याचे जाणवू लागले होते. फरदीनने १९९८ साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते.
- हेही वाचा –
- बॉलिवूडच्या पहिल्या स्टंट वूमन रेश्मा पठाण, ज्यांनी हेमा मालिनीपासून श्रीदेवीपर्यंत अनेक अभिनेत्रींसाठी केले खतरनाक स्टंट
- पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत ‘या’ अभिनेत्रींनी दाखवला दम आणि दिली अभिनेत्यांना मात
- Womens Day Special : ‘या’ महिलांनी त्यांच्या कर्तृत्वाने उंचावले संपूर्ण जगात भारताचे नाव