करिश्मा कपूर (Karishma Kapoor) ही हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने प्रत्येकाला वेड लावले आहे. करिश्मा कपूर ९०च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती. या काळातील तिचे चित्रपट चांगलेच गाजले आहेत. करिश्माचा सहजसुंदर अभिनय आणि मनमोहक सौंदर्याने तरुणाईला त्याकाळात चांगलेच मोहात पाडले होते. आता करिश्माच्या या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू पून्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. कारण करिश्माने ९०च्या दशकातील प्रसिद्ध निरमा पावडरच्या जाहिरातीच्या लूकमध्ये तशाच प्रकारची नवीन जाहिरात केली आहे. ज्याचा व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
नव्वदच्या दशकात निरमा पावडरच्या जाहिरातीने तुफान लोकप्रियता मिळवली होती. या जाहिरातीचे गाणे आणि नायिकांचा पांढऱ्या साडितील लूक त्या काळात चांगलाच गाजला होता. प्रत्येकाच्या ओठावर त्यावेळी हे गाणे आपसूक येत असायचे. यावेळी या जाहिरातीमध्ये ‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियाने अभिनय केला होता. आता तशाच प्रकारची त्याच थीममध्ये क्रेड बाउंटीची नवीन जाहिरात येत आहे, ज्यामध्ये करिश्मा कपूरने अभिनय केला आहे. यामुळे ९०च्या दशकातील या जाहिरातीची आठवण प्रत्येकाला होत आहे. या जाहिरातीचा व्हिडिओ करिश्मा कपूरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओची सुरूवात करिश्मा कपूरपासून होते. ज्यामध्ये ती चालत चालत दुकानाकडे जाताना दिसत आहे. दुकानदार तिला सामान देतो, मात्र ती त्याच्या पाठीमागे असलेल्या चार्जरची मागणी करते. यावेळी दुकानदार “तुम्ही दरवेळी साधा चार्जर मागता” असा प्रश्न करतो. तेव्हा ती म्हणते की, “हो पण जर क्रेडीट बाउंटीमध्ये आयफोन मिळत असेल तर आता साधा चार्जर कशाला?” असं म्हणते. तिच्या या उत्तरावर दुकानदारही चकित होताना दिसत आहे. या प्रसिद्ध जाहिरातीची थीम आणि मांडणी हुबेहुब निरमा पावडरच्या जाहिरातीसारखी दिसत आहे. त्यामुळे सर्वांना आता त्या जाहिरातीचीच आठवण होत आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना करिश्माच्या सुंदर लूकचे कौतुक केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










