Thursday, April 24, 2025
Home कॅलेंडर ‘हमको आजकल है इंतजार’, म्हणत अभिनेत्री वनिता खरातचे ‘हे’ सुंदर फोटो झाले व्हायरल

‘हमको आजकल है इंतजार’, म्हणत अभिनेत्री वनिता खरातचे ‘हे’ सुंदर फोटो झाले व्हायरल

शाहिद कपूर (shahid kapoor) आणि कियारा अडवाणी(Kiara Advani) यांच्या कबीर सिंग चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. जबरदस्त प्रेमकथा असलला हा चित्रपट प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला होता. चित्रपटातील शाहीद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. मात्र या चित्रपटात शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या व्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीरेखेने प्रचंड वाहवा मिळवली. ती व्यक्तिरेखा म्हणजेच चित्रपटात शाहिद कपूरच्या मोलकरणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat). चित्रपटात वनिता खरातची भूमिका छोटीशीच असली तरी तिच्या या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही प्रचंड चर्चेत असते. सध्या वनिता खरातचे नवीन फोटो सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहेत. 

कबीर सिंग चित्रपटातील पुष्पाच्या भूमिकेने चर्चेत आलेली अभिनेत्री वनिता खरात सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. कबीर सिंग चित्रपटात एका साध्या मोलकरणीची भूमिका साकारणारी वनिता खरात प्रत्यक्षात मात्र खूप बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सोशल मीडियावरुन ती नेहमीच तिचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यामध्ये तिच्या घायाळ करणाऱ्या हॉट अदांची झलक पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी वनिताच्या न्यूड फोटो शूटची चौफेर चर्चा झाली होती. तिच्या या बिनधास्त लूकचे काही जणांनी कौतुक झाले होते तर अनेकांनी तिच्यावर टीकाही केली होती. मात्र वनिताने त्यांना सडेतोड उत्तर देत आपला करारी बाणा दाखवून दिला होता. आता पुन्हा एकदा वनिताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वनिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा गुलाबी साडीतील मनमोहक लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये मोकळे केस सोडलेली आणि चेहऱ्यावर स्मित हास्य करत पोझ देणारी वनिता खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करत वनिताने “हमको आजकल है इंतजार” असा गोड कॅप्शन दिला आहे. वनिताच्या या सोज्वळ लूकवर फिदा झालेले चाहते भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तर काही जणांनी तिला कुणाची वाट पाहतेय असा प्रश्नही विचारला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा