दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) हे आज देशभरात प्रसिद्ध नाव आहे. दक्षिण भारताव्यतिरिक्त हिंदी भाषिक प्रेक्षकही त्याला खूप पसंत करतात. दक्षिण चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा ज्युनियर एनटीआर 20 मे रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करतो. त्याच्या वाढदिवशी, आज आम्ही तुम्हाला ज्युनियर एनटीआरच्या पाच चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आणि प्रेक्षकांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. तुम्ही ज्युनियर एनटीआरचे हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर सहजपणे पाहू शकता.
आरआरआर (2022)
सर्वप्रथम आपण ज्युनियर एनटीआर आणि अभिनेता रामचरण (Ramcharan) यांच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’ चित्रपटाबद्दल बोलू. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरने क्रांतिकारी ‘भीम’च्या भूमिकेत चाहत्यांची मने जिंकली आणि रिलीझ होताच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. तुम्ही ‘आरआरआर’ हा चित्रपट Zee5 आणि Netflix वर पाहू शकता. (junior ntr birthday hindi dubbed movies available on ott platform)
जय लव कुश (2017)
अभिनेता ज्युनियर एनटीआरचा ‘जय लव कुश’ हा एक ऍक्शन ड्रामा आहे. या चित्रपटातही ज्युनियर एनटीआरने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याने तिहेरी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त व्यवसाय केला. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर पाहू शकता.
अरविंद समेथा वीरा राघव (2018)
‘अरविंद समेथा वीरा राघव’ या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत पूजा हेगडे (Pooja Hegde) दिसली होती. अभिनेत्याचा हा चित्रपट देखील एक ऍक्शन थ्रिलर होता आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘अरविंद समेथा वीरा राघव’ हा चित्रपट तुम्ही Zee5 वर पाहू शकता.
जनता गॅरेज (2016)
ज्युनियर एनटीआरचा ‘जनता गॅरेज’ हा चित्रपट तर सुपरहिट ठरलाच, पण या चित्रपटाने अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. तुम्ही Disney Plus Hotstar वर जूनियर एनटीआरचा हा चित्रपट पाहू शकता.
राउडी बादशाह (2013)
ज्युनियर एनटीआर आणि अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Agarrwal) अभिनीत ‘राउडी बादशाह’मध्ये उत्कृष्ट स्क्रिप्टसह उत्कृष्ट स्क्रीन प्ले आहे. एनटीआरच्या या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या हिट चित्रपटांच्या यादीत याचा समावेश झाला आहे. ‘राउडी बादशाह’ हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म MX Player वर पाहू शकता.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! लग्नाच्या आधी ज्युनियर एनटीआर ‘या’ कारणामुळे अडकला होता कायद्याच्या कचाट्यात
नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव










