Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड ‘देवरा’मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आला समोर; ज्युनियर एनटीआरने वाढदिवसानिमित्त सैफला दिली भेट

‘देवरा’मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आला समोर; ज्युनियर एनटीआरने वाढदिवसानिमित्त सैफला दिली भेट

प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. सैफ सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. सैफ बुधवारी (16ऑगस्ट) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. सैफच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘देवरा’ चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

‘देवरा’ (Devara) हा साऊथचा चित्रपट आहे. ज्यात ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ज्युनियर एनटीआर यांनी स्वत: या चित्रपटातील सैफ अली खानचे (Saif Ali Khan) फर्स्ट लूक पोस्टर लाँच केले आहे. जे पाहिल्यानंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हे पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

साऊथ स्टार ज्युनियर एनटीआरने सैफ अली खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ‘देवरा’ मधील त्याचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. या चित्रपटात अभिनेता ‘भैरा’च्या भूमिकेत दिसणार आहे. एनटीआरने पोस्ट शेअर करताना लिहिले की, “सैफ सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.” या पोस्टरमध्ये सैफचे लांब केसांमध्ये दिसत आहेत. निर्मात्यांनी आधीच एनटीआरचा लूक रिलीज केला होता.

यासोबतच सैफ अली खान ट्विटरवर ट्रेंड करू लागला. चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. तसचे ‘देवरा’च्या पोस्टरचे कौतुकही करत आहेत. गेल्या अनेक चित्रपटांमध्ये सैफच्या वेगवेगळ्या भूमिका सातत्याने पाहायला मिळत आहेत. दक्षिणेतील मोठ्या प्रोजेक्टमध्येही तो सतत दिसत आहे. (Actor Saif Ali Khan’s look from ‘Deora’ is viral on social media)

सैफ अली खान शेवटचा प्रभासच्या आदिपुरुषमध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने लंकेशची भूमिका केली होती. या चित्रपटात काम केल्यामुळे सैफला खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. ‘देवरा’ पुढच्या वर्षी 5 एप्रिल 2024 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहूण चाहत्यांना चित्रपटाची आतुरता लागली आहे.

अधिक वाचा- 
टायगर श्रॉफच्या सुपरबोल्ड बहिणीपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या- Photo
अर्रर्र! गाणं गाताना प्रियांकाच्या नवऱ्याचा गेला तोल अन् प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकाच चुकला- लगेच पाहा Video

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा