Tuesday, October 15, 2024
Home अन्य “आता संचालिकापद मिरवण्यात काहीही अर्थ नाही” अभिनेत्री मधुराणी गोखलेने स्पष्ट केला ‘त्या’ पोस्ट मागचा हेतू

“आता संचालिकापद मिरवण्यात काहीही अर्थ नाही” अभिनेत्री मधुराणी गोखलेने स्पष्ट केला ‘त्या’ पोस्ट मागचा हेतू

मराठी टेलिव्हिजन विश्वात टॉपची मालिका म्हणून सध्या आई कुठे काय करते खूपच गाजत आहे. या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठत अनेक रेकॉर्ड कायम केले आहेत. मालिकेने यश मिळवत असता मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना देखील मोठी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. अभिनेत्री मधुराणीला ‘अरुंधती’ म्हणून अफाट प्रसिद्धी या शो ने मिळवून दिली आहे.

मात्र मधल्या काही दिवसांपासून अचानक मधुराणी आणि तिचे पती असलेल्या प्रमोद प्रभुलकर यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. लवकरच ते दोघं वेगळे होणार असल्याचे सतत कानावर पडत आहे. अशातच मधुराणीने एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून सर्वांचेच डोळे मोठे झाल्याशिवाय राहणार नाही.

मधुराणी आणि प्रमोद हे दोघं मिळून ‘मिरॅकल्स अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अॅंड प्रायव्हेट लिमिटेड’ ही अभिनयाची शाळा चालवत आहे. या अॅकॅडमीच्या अनेक शाखा असून, खूपच लोकप्रिय अॅकॅडमी म्हणून हिला ओळखले जाते. आतापर्यंत मराठी मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या अनेक कलाकारांना या अॅकॅडमीनेच ओळख मिळवून दिली आहे. मात्र मधुराणीने याच अॅकॅडमीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. तिच्या या राजीनाम्यानंतर मोठ्या चर्चांना उधाण आले होते.

मधुराणीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात लिहिले, आहे की, “कृपया नोंद घ्यावी. ‘मिरॅकल्स अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अॅंड प्रायव्हेट लिमिटेड’ ही मी आणि प्रमोद (प्रभुलकर) आम्ही दोघांनी मिळून सुरू केलेली संस्था. अभिनय प्रशिक्षणाबरोबरच इतरही कल्पक उपक्रम संस्थेमार्फत आम्ही केले. परंतु माझ्या विविध क्षेत्रातील वाढलेल्या व्यस्ततेमुळे मला संस्थेच्या दैनंदिन कार्यकारिणीत लक्ष घालता येत नाही. तरी समन्वयाने निर्णय घेत मी संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. संस्थेशी माझा आता कोणताही संबंधं नसेल, तरी शुभेच्छा कायम असतीलच.”

मधुराणीने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. ती म्हणाली, “बऱ्याच वर्षांपूर्वी मी आणि प्रमोदने मिरॅकल अकॅडमी सुरू केली. मात्र मला आता जणू लागले आहे की, इथे मला अजिबात वेळ देता येत नाहीये. अकॅडमी हा काय माझ्या आवाक्याचा भाग नाही. हे काय माझं स्वप्न नव्हतं. मालिका वगैरे सुरू झाल्यानंतर तर काय सुरू आहे, अकॅडमीच्या शाखा कुठे आहेत, कोण शिकवते याचा मला काहीच गंध नव्हता. तेरा-तेरा तास मालिकेचे शूटिंग आणि उरलेला वेळ मुलीसाठी. सर्व काही प्रमोदच्या बघतो म्हणून मी प्रमोदला सांगितले की, तू हे पूर्णपणे सांभाळ, माझ्या पदाचे करू काय मी?”

दरम्यान मधुराणी आणि प्रमोद यांच्या मिरॅकल अकॅडमीमधून ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर आदी अनेक कलाकार तयार झाले आहेत.

अधिक वाचा- 
बाबो!!! अल्लू अर्जुनकडून ‘पुष्पा 2’चा डायलॉग लीक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
नाकातून गातो म्हणून टीकेचा धनी ठरणाऱ्या हिमेशला ‘भाईजान’ने दिलेला पहिला ब्रेक, 120सिनेमांना दिलंय संगीत

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा