आमिर खानची लाडकी लेक इराने केले बॉयफ्रेंडसोबतचे गोंडस फोटो शेअर; म्हणाली, ‘हा खूपच ड्रामेबाज…’


कलाकार आणि त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये एका वेगळाच उत्साह आणि वेगळीच उत्सुकता असते. जेव्हा एखाद्या कलाकाराच्या रिलेशनशिपबद्दल बातम्या येतात, तेव्हा सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये याच्या भरपूर चर्चा रंगताना देखील दिसतात. आता तर कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांनाच जास्त महत्व आल्याचे दिसते. ही सर्व कमाल सोशल मीडियाची आहे. कलाकरां इतकीच लोकप्रियता किंबहुना जरा अधिकच लोकप्रियता स्टार्स किड्सला मिळते. या स्टार्स किड्समध्ये मागील काही काळापासून आयरा खान ही आमिर खानची मुलगी चांगलीच चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर आयरा खान तुफान लोकप्रिय आहे. आयरा तिच्या पोस्टमुळे आणि तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे नेहमी प्रकाशझोतात असते. ती तिच्या सोशल मीडियावरून नेहमीच तिचे आणि तिच्या बॉयफ्रेंडचे फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे तीन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये आयरा आणि नुपूर दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. यात आयरा एका सोफ्यावर बसलेली दिसत असून, तिच्यापुढे नुपूर बसलेला दिसत आहे.

आयराने हे फोटो शेअर करताना नुपूरला ड्रामेबाज म्हणत लिहिले, “हा खूपच ड्रामेबाज आहे. प्रेम, कडल आणि आनंदाचा आधार.” या दोघांनी लॉकडाऊनच्या आधी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आयराने त्यांचे रिलेशन सोशल मीडियावर जाहीर केले. नुपूरसोबत आयराच्या फोटोंना फॅन्ससोबतच कलाकारांनी देखील कमेंट केली आहे.

नुपूर शिखरे आणि आयरा खान हे दोघं सोशल मीडियावर नेहमी त्यांचे फोटो शेअर करत असतात. शिवाय हे दोघे एकमेकांसोबत वर्कआऊट करताना देखील बऱ्याचदा दिसतात. यासोबतच ते अनेकदा फूड रिव्ह्यू देखील करताना दिसतात. आयरा ही आमिर खान आणि त्याची पहिली बायको रीना दत्ता यांची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच आमिरने त्याच्या दुसऱ्या बायकोपासून म्हणजेच किरण रावपासून घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदर अन् सुशील!’ अक्षय कुमारची अभिनेत्री चित्रांगदाने साडीतील फोटो शेअर करत लावलं नेटकऱ्यांना याड

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’


Leave A Reply

Your email address will not be published.