Tuesday, June 25, 2024

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने आत्महत्या करून संपवले आयुष्य; कारण अद्याप अस्पष्ट

तेलुगू अभिनेता चंद्रकांत (Chandrakanta) यांच्या चाहत्यांसाठी दुःखाची बातमी बातमी आहे. चंद्रकांत यांचे निधन झाला आहे, या अभिनेत्याने शुक्रवारी तेलंगणातील अल्कापूर येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. चंद्रकांत यांच्या निधनाची बातमी त्यांची सहकलाकार आणि जवळची मैत्रीण पवित्रा जयराम यांच्या निधनानंतर काही दिवसांनी आली. नुकतेच पवित्रा जयराम यांना कार अपघातात प्राण गमवावे लागले.

पवित्रा जयराम यांच्या निधनाने चंद्रकांत यांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी नोंदवलेल्या चंद्रकांतच्या वडिलांच्या जबाबानुसार, अभिनेता गेल्या काही दिवसांपासून मानसिक धक्क्यात होता. अभिनेत्याने पवित्रासाठी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेवटची पोस्टही लिहिली आहे. दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळतंय. या दोघांनी ‘त्रिनयणी’मध्ये एकत्र काम केले होते.

एका पोस्टमध्ये चंद्रकांतने लिहिले होते, ‘तिने मला एकटे सोडले, मला ते सहन होत नाही’. या पोस्टमध्ये त्यांनी पवित्राला टॅग केले होते. याशिवाय आणखी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘कृपया परत या. तुझी आठवण येते. तू मला एकटे सोडलेस हे मला सहन होत नाही. पुन्हा एकदा माझं नाव घे. चंद्रकांत यांच्या निधनाने चाहते दु:खी झाले आहेत.

एका पोस्टमध्ये चंद्रकांत यांनी लिहिले होते, ‘गुड मॉर्निंग नाना. जिमची वेळ झाली आहे. आमच्या प्रशिक्षकाने फोन केला. तुझ्यावर प्रेम आहे’. एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते, ‘नाना, दोन दिवस थांबा’. अभिनेत्याच्या या पोस्टनंतर चाहते घाबरले. आंध्र प्रदेशातील मेहबूब नगर येथे १२ मे २०२४ रोजी एका भीषण कार अपघातात पवित्रा यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तेलुगू टीव्ही मालिका ‘त्रिनयणी’मध्ये तिलोत्तमाची भूमिका साकारून पवित्रा घराघरात नावारूपाला आले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कान्स 2024 मध्ये कियारा आणि ऐश्वर्याचा जलवा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
अब्दुच्या लग्नात सलमान असणार खास पाहुणा; म्हणाला, ‘मोठ्या भावाच्या येण्याची वाट पाहतोय’

हे देखील वाचा