डान्सिंग स्वॅगपासून फॅशन सेन्सपर्यंत सर्वच बाबतीत उजव्या ठरलेल्या गोविंदामधेच होती तिन्ही खानांना टक्कर द्यायची हिंमत

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने ८० आणि ९० च्या दशकात पाहिलेले स्टारडम हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. गोविंदा हा त्याच्या काळातील असा अभिनेता होता, ज्याची फॅन फॉलोविंग प्रत्येक वयाच्या प्रेक्षकांमध्ये होती. गोविंदा हा मास आणि क्लास अशा दोन्ही श्रेणींचा अभिनेता मानला जात असे. बाकी स्टार्सपेक्षा वेगळा अभिनेता म्हणून गोविंदाची ओळख आहे. त्याची स्वतःची एक वेगळी स्टाईल होती, ज्यामुळे तो इतर कोणत्याही सुपरस्टारपेक्षा वेगळा होता. गोविंदा मंगळवारी (२१ डिसेंबर) त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये अनेक ऍक्शन, रोमँटिक हिरो आहेत आणि भविष्यातही येतील मात्र, गोविंदाची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असे नेहमीच म्हटले जाते. त्याने जे स्टारडम अनुभवले आहे, जे यश मिळवले आहे ते बघण्यासाठी प्रत्येक कलाकार आसुसलेला असतो. पण हे भाग्य सगळ्यांच्याच नशिबी येते असे नाही. गोविंदा याबाबतीत नशीबवान ठरला आणि त्याने न भूतो न भविष्यती असे स्टारडम अनुभवले. गोविंदा बाकी कलाकारांपेक्षा वेगळा का होता, चला तर मग त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

डान्समध्ये नंबर १

स्ट्रीट डान्स हा गोविंदाचा खरा यूएसपी होता. आजही लोकं गोविंदाच्या गाण्यांवर उड्या मारतात. ‘आंखियों से गोली मारे’, ‘किसी डिस्को में जाएं’, ‘तुझे मिर्ची लगी तो’, ‘यूपी वाला ठुमका लगाओं’ सारखी गाणी असोत. चाहते त्याच्या डान्सची कॉपीही करतात. गोविंदा स्ट्रीट आणि टपोरी या डान्समध्ये नंबर १ मानला जायचा.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

रंगीत कपडे

गोविंदाचा ड्रेसिंग सेन्सही बाकी स्टार्ससारखा नव्हता. त्याच्या चित्रपटांमध्येही तो भडक रंगाच्या कपड्यांमध्ये दिसायचा. मग ती लाल पँट असो, रंगीबेरंगी शर्ट असो किंवा मल्टीकलर सनग्लासेस असो. गोविंदा जे परिधान करायचा ती फॅशन बनली जायची. ‘आंटी नंबर वन’ सारख्या चित्रपटातही गोविंदाने साडी नेसण्यासही मागेपुढे पाहिले नाही.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

चित्रपटांतील धमाकेदार गाणी

गोविंदाच्या चित्रपटांची गाणी इतकी लोकप्रिय होती की, चाहते गाणी ऐकून चित्रपटाची वाट पाहत असत. गाण्यांवर गोविंदाचा डान्स सिनेरसिकांसाठी प्रचंड आनंद देणारा होता. ‘हीरो नंबर वन’, ‘कुली नंबर वन’, ‘राजा बाबू’, ‘हसीना मान जाएगी’, ‘साजन चले ससुराल’ असे अनेक चित्रपट आहेत ज्यांची गाणी ब्लॉकबस्टर ठरली आहेत आणि आजही ती पार्ट्यांमध्ये ऐकायला मिळतात.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

कॉमेडी चित्रपटातून बनला नंबर १

गोविंदाने ऍक्शन आणि रोमँटिक चित्रपटही केले आहेत. पण त्याला कॉमेडी चित्रपटांमध्ये सर्वाधिक पसंती मिळाली. ‘जोरू का गुलाम’, ‘परदेसी बाबू’, ‘हीरो नंबर १’, ‘जोडी नंबर १’, ‘साजन चले ससुराल’ असे अनेक चित्रपट आहेत जे ब्लॉकबस्टर ठरले आणि गोविंदा नंबर १ स्टार ठरला.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

स्वॅग

रणवीर सिंग सारख्या स्टार्सच्या खूप आधी एक काळ असा होता की, गोविंदा जे काही स्वॅग करत असे. फॅशन आयकॉनसारखे विचित्र कपडेही तो कॅरी करत असे. ही त्यांची खासियत होती. आजही गोविंदा काहीही करतो, तो ‘हिरो नंबर १’ सारखाच दिसतो.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

स्तुतीमुळे इंडस्ट्रीतून पडला बाहेर

नव्वदच्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक गोविंदा आजकाल चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये दिसतो. माध्यमांशी संवाद साधताना एकदा गोविंदा म्हणाला होता की, “चित्रपटसृष्टीतील हेव्यामुळे लोक माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवतात. सर्वांची वेळ खराब असते, माझाही होती किंबहुना आहे. मी स्तुतीचा शिकार झालो. माझ्या चांगल्या कामाची, डान्सची आणि लूकची प्रशंसा झाल्यामुळे मी इंडस्ट्रीतून बाहेर पडलो.”

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

‘तन बदन’मधून बनला हिरो

गोविंदा कॉमर्समधून ग्रॅज्युएट झाला आहे आणि ग्रॅज्युएशन केल्यानंतर तो अनेक ठिकाणी नोकरीसाठी गेला पण त्याला नोकरी मिळाली नाही.गोविंदाच्या नशिबात हिरो बनणे लिहिले होते म्हणून हे घडले असे म्हणता येईल. यानंतर गोविंदाला ८० च्या दशकात प्रथम एल्विन नावाच्या कंपनीची जाहिरात मिळाली. लवकरच त्याला ‘तन-बदन’ या चित्रपटात नायक बनण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये दक्षिण अभिनेत्री खुशबू हिरोईन होती.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

तिन्ही खानांना द्यायचा स्पर्धा 

‘लव्ह ८६’ या चित्रपटातून त्याला जे यश मिळू लागले आणि ९० च्या दशकापर्यंत तो इंडस्ट्रीत रुजू झाला. ९० च्या दशकात या तीन खानांशिवाय बॉक्स ऑफिसवर त्यांच्याशी स्पर्धा करणारा कोणी असेल, तर तो गोविंदा होता. एक काळ असा होता की, गोविंदा एका वर्षात ८ ते ९ चित्रपट प्रदर्शित करायचा आणि कमाईही करायचा.

हेही वाचा :

अशाप्रकारे शूट झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील रोमॅंटिक सीन शूट, प्रार्थनाने केला व्हिडिओ शेअर

नवीन घराच्या बाल्कनीमध्ये रोमॅंटिक झाले कॅटरिना आणि विकी, शेअर केला क्युट फोटो

लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी 

Latest Post