खरंच की काय! जॅकी श्रॉफ यांच्या भावाच्या मृत्यूपूर्वी वडील ज्योतिषी म्हणाले होते, ‘आज काहीतरी वाईट..’


जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे चित्रपट जगतातील एक मोठे नाव आहे, ज्यांनी बॉलिवूडला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. ट्विंकल खन्नासोबतच्या (Twinkle Khanna) संभाषणात अभिनेत्याने एका घटनेचा उल्लेख केला, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला. त्यांनी सांगितले की, त्यांचे वडील ज्योतिषी होते. त्यांनी त्यांच्या भावाच्या मृत्यूपूर्वी काहीतरी फार वाईट होईल याचा अंदाज वर्तवला होता.

जॅॅकी श्रॉफ यांचे वडील होते ज्योतिषी
जॅकी यांचे वडील म्हणाले होते की, आज काहीतरी वाईट होणार आहे. यावर अभिनेत्याने आपल्या भावाला सावध राहण्यास सांगितले होते, परंतु ते कोण टाळू शकेल. त्या दिवशी जॅकी यांचा भाऊ हे जग सोडून गेला. ट्विंकलच्या  ‘ट्वीक इंडिया’ प्लॅटफॉर्मवर अभिनेत्याने या घटनेबद्दल सांगितले होते.

जॅकी यांनी भावाला सांगितले की, “आजचा दिवस वाईट आहे, त्यामुळे घराबाहेर जाऊ नकोस.” अभिनेत्याचा भाऊ सेंच्युरी मिलमध्ये कामासाठी जात असे. अभिनेत्याने भावाला सांगितले होते, “आज चक्कीमध्ये जाऊ नकोस.” तो गेला नाही, पण समुद्रात कोणालातरी बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली आणि तो स्वतः च बुडाला.

जॅकी यांच्याबद्दलची भविष्यवाणीही ठरली खरी
जॅकी यांनी पुढे सांगितले की, “वडिलांनी सांगितले की, तो वाईट दिवस असेल, तर त्या दिवशी भावाचा मृत्यू झाला. मला सांगितले की, मी अभिनेता होणार, मग मी अभिनेता झालो.” जॅकी यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनीही अंबानी कुटुंबाबाबत भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली.

ट्विंकलने जॅकी यांच्या इंग्रजी बोलण्याचे केले कौतुक
जॅकी यांच्यासोबतच्या संभाषणात ट्विंकलने त्याच्या इंग्रजी बोलण्याचे कौतुक केले. तेव्हा अभिनेता म्हणाले की, ते मुंबईत मोठे झाले आहेत. येथील स्थानिक लोक हीच भाषा बोलतात. जॅकी यांनी केवळ ११ वीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. अभिनेत्याने पुढे सांगितले की, ते अनुभवातून शिकले आहेत. ते लक्षपूर्वक ऐकायचे, चित्रपट पाहायचे. त्यांनी अमेरिकन अभिनेते क्लिंट ईस्टवुडला इंग्रजी शिक्षक म्हणून स्वीकारले.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!