Saturday, January 28, 2023

मोठ्या पडद्यावर दिसणार कॉमेडियनच्या संघर्षाची कहाणी, कपिल शर्माच्या बायोपिकची झाली घोषणा

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. जो प्रेक्षकांना आपले दुःख आणि ताण विसरून पोट धरून हसायला लावतो. मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे. मोठमोठे सेलेब्स देखील स्वतःला त्याचे चाहते म्हणवतात. मात्र, इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. दरम्यान, कपिलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता कपिलच्या संघर्षाची संपूर्ण कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. होय, कपिल शर्माचा बायोपिक बनणार आहे, ज्याची घोषणा झाली आहे.

कपिलच्या बायोपिकची झाली घोषणा
ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर कपिल शर्माच्या बायोपिकची माहिती दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘फुकरे’ या सुपरहिट फ्रँचायझीचे दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा करणार आहेत, ज्याचे नाव ‘फनकार’ असेल. या घोषणेसोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये कपिल शर्मा मृगदीप सिंग लांबा आणि निर्माता महावीर जैन यांच्यासोबत दिसत आहे. मात्र, या बायोपिकमध्ये कपिलची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा झालेला नाही.

 

कपिलच्या यशात अर्चनाचा आहे महत्त्वाचा वाटा
कपिलने नुकतेच सांगितले की, अर्चना पूरण सिंगचा त्याच्या यशात मोठा वाटा आहे. कपिल आणि अर्चना एकमेकांची खिल्ली उडवत असल्याचे तुम्ही ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अनेकदा पाहिले असेल. पण स्ट्रगलच्या दिवसांत जर तिने कपिलला साथ दिली नसती, तर कदाचित तो एवढा मोठा स्टार कधीच बनला नसता.

कपिलला नेहमीच दिला पाठिंबा
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कपिलने सांगितले की, “मला स्टार बनवण्यात अर्चनाजींचा मोठा वाटा आहे. संघर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांत त्या माझे खूप कौतुक करत असे आणि कलाकाराला हेच हवे असते, जे त्याचे मनोबल वाढवते. आमच्यात कोणतीही औपचारिकता नाही. आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि म्हणूनच आम्ही एकमेकांचा पाय खेचत राहतो.” ‘द कपिल शर्मा शो’पूर्वी कपिल ‘कॉमेडी सर्कस’चा भाग होता, ज्यामध्ये अर्चना पूरण सिंग परीक्षक होत्या.

हेही वाचा :

हे देखील वाचा