Thursday, March 28, 2024

बिग बींच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा, जेव्हा बनला त्यांच्याच कुटुंबाचा भाग; वाचा कुणालबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूरने ‘द एम्पायर’ या वेब सीरिजमध्ये बाबर सारखी गुंतागुंतीची व्यक्तिरेखा साकारून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. तो अभिनय जगात प्रवेश करेल याची कल्पनाही त्याने कधी केली नव्हती. त्याला फक्त बॉलिवूडमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडून राहायचे होते. म्हणूनच त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. तो अमिताभ बच्चन यांच्या ‘अक्स’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक होते. त्यावेळी त्याला काय माहित होते की, एक दिवस तो देखील बच्चन कुटुंबाचा एक भाग बनेल. कुणाल कपूर सोमवारी (१८ ऑक्टोबर) आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे.

मुंबईत १८ ऑक्टोबर १९७७ रोजी जन्मलेल्या कुणालचे वडील किशोर कुमार हे व्यापारी होते. आई कानन गृहिणी असण्याबरोबरच गाणीही गात होत्या. ज्याचा परिणाम कुणालवर झाला आणि तो कलाविश्वाकडे आकर्षित झाला होता. शाळेत असताना त्याने अनेक नाटकं केली. नंतर त्याने बॅरी जॉनकडून अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले. यानंतरही त्याचा अभिनयाचा कोणताही हेतू नव्हता.

कुणाल जेव्हा ‘अक्स’ चित्रपटात दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहराला सहाय्य करत होता. तेव्हा राकेश यांनी एके दिवशी त्याला फोन केला आणि म्हणाले की, “हे बघ, तू कॅमेराच्या मागे राहण्यापेक्षा पुढे छान दिसतो.” मग त्याने अभिनयात हात आजमावण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला एकाच दिवशी दोन मोठे चित्रपट ऑफर करण्यात आले होते. एक चित्रपट होता प्रसिद्ध चित्रकार एमएफ हुसेनचा ‘मीनाक्षी’ आणि दुसरा राकेश ओमप्रकाश मेहराचा ‘रंग दे बसंती’ होता.

‘रंग दे बसंती’ चित्रपटातील त्याचे काम सर्वांना आवडले. यानंतर त्याने ‘हॅट्रिक’, ‘लगा चुनरी में दाग’, ‘आजा नच ले’, ‘लम्हा’, ‘डॉन -२’ आणि ‘गोल्ड’ असे अनेक चित्रपट केले. पण त्याला पाहिजे ते यश मिळाले नाही. दरम्यान, २०१५ मध्ये त्याने अमिताभ बच्चन यांचे बंधू अजिताभ बच्चन यांची मुलगी नैनाशी लग्न केले.

आता कुणाल चित्रपट निर्मिती क्षेत्रातही उडी घेण्याचा विचार करत आहे. त्याने त्याच्या एका मुलाखतीत म्हटले होते, जेव्हा तो सहाय्यक दिग्दर्शक होता, तेव्हापासून तो कथा लिहित आहे. आता त्याला केवळ अभिनेता म्हणून नव्हे, तर निर्माता, दिग्दर्शक म्हणूनही त्याच्या कथा पडद्यावर सादर करायला आवडतील.

माध्यमांतील वृत्तानुसार, कुणाल कपूर त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत सहा वेळा विंटर ऑलिम्पियन शिवा केशवनचा बायोपिक बनवणार आहे आणि त्याने यावर आधीच काम सुरू केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हँडसम हंक’ कुणाल कपूर आणि बच्चन घराण्यात नक्की नातं आहे तरी काय?

-अक्षय कुमारच्या आगामी ‘गोरखा’ चि्त्रपटाच्या पोस्टरवर चुकीचे हत्यार पाहून भडकले माजी सैन्य अधिकारी; म्हणाले…

-अफेअरच्या चर्चामध्ये समोर आला व्हिडिओ, एकमेकांना मिठी मारताना दिसले विक्की आणि कॅट

हे देखील वाचा