खूप वाईट झालं! ‘शक्तिमान’ मुकेश खन्ना यांच्या बहिणीचे निधन, सोशल मीडियावर भावुक पोस्ट केली शेअर

Actor Mukesh Khanna Elder Sister Passes Away In Delhi Actor Shares An Emotional Post


टीव्हीवरील प्रसिद्ध ‘शक्तिमान’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या बहिणीचे दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत आपल्या बहिणीच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, १२ दिवसांपासून त्यांची बहीण कोरोना व्हायरसशी झुंज देत होती. याला पराभूत केल्यानंतर फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले आहे.

मुकेश खन्ना यांनी आपल्या बहिणीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, “काल माझ्या मृत्यूच्या खोट्या बातमीबद्दल सांगताना मी तासंतास संघर्ष करत राहिलो. मात्र, मला माहिती नव्हते की, माझ्यावर एक भयंकर सत्य घुसळत आहे. आज माझी एकुलती एक मोठी बहीण कमल कपूरचे दिल्लीत निधन झाले आहे. तिच्या निधनामुळे मला धक्का बसला आहे. आमच्या कुटुंबात सर्वजण दु:खात आहेत. १२ दिवसात कोरोना व्हायरसला पराभूत केल्यानंतर फुफ्फुसाच्या आजारापुढे पराभूत झाली. माहिती नाही देव कोणता हिशोब करत आहे. खरंच मी आयुष्यात पहिल्यांदा हादरलो आहे.”

काही दिवसांपूर्वी पसरली होती मृत्यूची अफवा
नुकतेच काही दिवसांपूर्वी मुकेश खन्ना यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. ज्यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, ते एकदम ठणठणीत आहेत. ते म्हणाले होते की, “मी हे सांगण्यासाठी समोर आलो आहे की, मी एकदम ठणठणीत आहे. मला या अफवेचे खंडन करण्यास सांगितले आहे. यासोबतच मी अशा बातम्या पसरवणाऱ्या व्यक्तींचा निषेध करतो. हीच सोशल मीडियाची समस्या आहे. मी बिल्कुल ठीक आहे आणि तुमच्या प्रार्थना माझ्यासोबत आहेत, तर मग मला काय होऊ शकते. माझी इतकी काळजी केल्याबद्दल धन्यवाद. मला अनेकांचे फोन येत आहेत. तुम्हा सर्वांचे आभार.”

मुकेश खन्ना खूप प्रसिद्ध अभिनेते आहेत. ‘महाभारत’ या मालिकेतील भीष्म पितामह या भूमिकेसाठी त्यांनी ओळखले जाते. सध्या ते चित्रपट आणि टीव्हीपासून दूर आहेत. ते सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. व्हिडिओ शेअर करून ते प्रत्येक मुद्द्यावर आपले मत स्पष्ट करत असतात. ते शेवटचे ‘मनी बँक गॅरंटी’ चित्रपटात झळकले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मृत्यूचं सत्र सुरूच! तमिळ अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन, अवघ्या ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

-जेव्हा १६ वर्षीय जन्नत झुबेरच्या किसींग सीनवर भडकली होती आई, वडिलांनी दिली होती अशी प्रतिक्रिया

-‘तेव्हा खिसा रिकामा असायचा, पण…’, म्हणत कपिल शर्माने शेअर केला २३ वर्ष जुना फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ


Leave A Reply

Your email address will not be published.