Sunday, October 1, 2023

ब्रेकिंग! अभिनेता पंकज त्रिपाठीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, मायेचं छत्र हरपलं

मनोरंजन विश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर आली आहे. ‘OMG 2‘ चित्रपटातून चर्चेत आलेल्या अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपलं आहे. अभिनेत्याचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे निधन झाले आहे. ते 99 वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या मूळ गावी बेलसंड येथे अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अभिनेता त्याच्या मूळ गावी रवाना झाला आहे.

वडिलांच्या जाण्याने तो खूप दुःखी झाला आहे. या कठीण काळात अक्षय कुमारने त्याला साथ दिली आहे. या महिन्यात रिलीज झालेल्या ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटात दोघेही एकत्र दिसले होते.पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन कोणत्या तरी आजारामुळे झाले आहे, असे सांगितले जात आहे. पण अद्यापही खरे कारण समोर आले नाही. पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांवर 21 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अक्षय कुमारने ट्विट करताना लिहिले की, “माझा मित्र आणि सहकलाकार पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले. पालकांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. ईश्वराने त्यांच्या वडिलांच्या आत्म्यास त्यांच्या चरणी स्थान देवो. ओम शांती.” त्याच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

 पंकज त्रिपाठी हा बिहारमधील गोपालगंज भागातील रहिवासी आहे. अभिनेता करिअरच्या निमित्ताने मुंबईत राहत असताना वडील आणि आई गावात राहत होते. पंकज त्रिपाठीच्या वडिलांना तो चित्रपटसृष्टीत काय काम करतो हेही त्यांना माहीत नव्हते, असे सांगितले जाते. एक मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी सांगितले की, त्याच्या वडिलांची इच्छा नव्हती की त्याने अभिनेता व्हावे. मुलाने शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. (Actor Pankaj Tripathi father passes away)

अधिक वाचा- 
सलमानचा ‘गजनी’ लूक सोशल मीडियावर व्हायरल; चाहते म्हणाले- ‘तेरे नाम 2ची तयारी…’
‘रोज मासे खा… ऐश्वर्या रायसारखे सुंदर व्हा’, भाजप सरकारच्या ‘या’ मंत्र्याचा तरुणांना अजब सल्ला

हे देखील वाचा