मिश्याही फुटल्या नव्हत्या, तेव्हा रणवीरने गमावली होती व्हर्जिनिटी; १२व्या वर्षीच…

0
62
Ranveer-Singh
Photo Courtesy : Instagram/ranveersingh

बॉलिवूड हे वरवर जसे दिसते, तसे नाहीये. यामध्ये अनेक रहस्य दडले आहेत. सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांपासून ते सिनेमावर पैसे लावणाऱ्या निर्मात्यांपर्यंत प्रत्येकाचे आयुष्य रहस्यांनी भरलेले आहे. यातील काही रहस्य तसेच राहतात, तर काही कालांतराने बाहेरही येतात. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचे आयुष्यही रहस्यांनी भरलेले आहे. यातील एका रहस्याचा खुलासा त्याने एकदा केला होता. त्याचे हे रहस्य ऐकल्यानंतर अनेकांना त्यांच्या कानावरही विश्वास बसला नव्हता. चला तर काय होते ते रहस्य जाणून घेऊया…

आपल्या अभिनयासोबतच अतरंगी स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेला रणवीर सिंग (Ranveer Singh) याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होता. त्याने २०१७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत किसबद्दल सांगितले होते. त्याने असेही सांगितले होते की, त्यावेळी तो कोणत्या वर्गात शिकत होता आणि त्याचा अनुभव कसा होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीर म्हणाला होता की, “जेव्हा मी पहिली किस केली होती, तेव्हा मी कदाचित सातवीमध्ये शिकत होतो. म्हणजे पहिली प्रॉपर किस, मला वाटले की, हे खूप भारी आहे यार. ती माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठी होती. ती दुसऱ्या शाळेतील होती आणि सर्वात सुंदर मुलींपैकी एक होती.”

कोचिंग सोडून गेला होता मुलीला भेटायला
रणवीरने पुढे सांगितले होते की, तो टेबल टेनिसची कोचिंग सोडून त्या मुलीला भेटायला गेला होता. अभिनेता म्हणाला होता की, “मी आपल्या टेबल टेनिसची कोचिंंग बंक केली होती, जेणेकरून मी त्या मुलीला भेटू शकेल. हे त्यासाठी गरजेचेही होते. तो माझ्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. त्यावेळी मी पूर्णपणे टेबल टेनिसची कोचिंग घेत असायचो आणि चँपियनही बनू शकलो असतो.”

वयाच्या १२व्या वर्षी गमावली होती व्हर्जिनिटी
दुसऱ्या एका मुलाखतीत रणवीरने त्याच्या व्हर्जिनिटीबद्दल सांगितले होते. त्याने खुलासा केला होता की, “१२ वर्षांच्या वयात मी व्हर्जिनिटी गमावली होती. खरं तर हे प्रेमामुळे नाही, तर उत्सुकतेपोटी झाले होते.”

रणवीर आणि दीपिकाचे लग्न
अभिनेता रणवीर सिंग याने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिच्यासोबत १४ नोव्हेंबर, २०१८ रोजी इटली येथे कोकणी आणि सिंधी रीतिरिवाजानुसार लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला आता ४ वर्षे पूर्ण होत आली आहेत.

रणवीरच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर तो शेवटचा २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयेशभाई जोरदार’ या सिनेमात झळकला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री शालिनी पांडे हीदेखील मुख्य भूमिकेत होती. आता तो ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणारे ५ मराठी सिनेमे तुम्हाला माहितीयेत का? एका क्लिकवर घ्या जाणून

आशा भोसले, सुनील दत्त ते बच्चन कुटुंबीय! भारतीय सिनेसृष्टीने केलेले सगळे वर्ल्डरेकॉर्ड एकाच ठिकाणी

चेष्टा करताय व्हय! एका एपिसोडसाठी ‘एवढे’ लाख कोण घेतं का? वाचा सीआयडी कलाकार किती रुपये छापायचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here